Join us  

विराट कोहलीच्या संघाला जसप्रीत बुमराहने केले ट्रोल, म्हणाला...

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने तर विराट कोहलीच्या संघाला ट्रोल केल्याचे पाहायला मिळत आहे. पण नेमकं बुमराहने केलंय तरी काय...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2020 3:03 PM

Open in App

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिका काही दिवसांपूर्वीच झाली. या मालिकेत भारताला न्यूझीलंडकडून ३-० असा मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर बऱ्याच जणांनी भारताचा कर्णधार विराट कोहलीवर टीका केली आहे. त्याचबरोबर काहींनी कोहलीबरोबर संघालाही धारेवर धरले आहे. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने तर विराट कोहलीच्या संघाला ट्रोल केल्याचे पाहायला मिळत आहे. पण नेमकं बुमराहने केलंय तरी काय...

तिसऱ्या वनडे सामन्यानंतर चाहत्यांनी शार्दुलबरोबर आता तर बुमराहलादेखील ट्रोल करायला सुरुवात केली आहे. बुमराह हा भारताचा गोलंदाज नसून न्यूझीलंडचा फलंदाज आहे, असे चाहत्यांचे म्हणणे आहे. कारण न्यूझीलंडविरुदधच्या तीन वनडे सामन्यांमध्ये बुमराहला एकही बळी मिळवता आलेला नाही. बुमराहने तीन वनडे सामन्यांत ३० षटके टाकली. या ३० षटकांमध्ये त्याने एक षटक निर्धावही टाकले. पण या ३० षटकांमध्ये बुमराहने १६७ धावा दिल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे तीन वनडे सामन्यांमध्ये बुमराहने न्यूझीलंडला एक फलंदाज म्हणून मदत केली, असे चाहत्यांचे म्हणणे आहे.

बुमराने यावेळी विराट कोहलीच्या संघावर म्हणजेच आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर टीका केली आहे. इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) आगामी हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB) संघाच्या नावात आणि लोगोमध्ये बदल पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली होती. RCBनं बुधवारी तसे संकेत दिले होते. त्यांनी त्यांच्या सोशल अकाऊंट्सवरील प्रोफाईल फोटो हटवले आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या नावाऐवजी केवळ रॉयल चॅलेंजर्स असे नाव ठेवले. आज आरसीबीने आपल्या ट्विटर हँडलवर आपला नवीन लोगो शेअर केला आहे. 

बुमराहने या लोगोवर तोंडसुख घेतले आहे. या लोगोमध्ये लाल रंग कायम ठेवण्यात आला आहे. पण या लोगोमध्ये पूर्वी असलेला सिंह पुन्हा पाहायला मिळणार आहे. या लोगोमध्ये सिंहाचा रंग लाल ठेवण्यात आला आहे. हा सिंहाची पोझ माध्या गोलंदाजीसारखी आहे, असे म्हणत बुमराहने आरसीबीला ट्रोल केले आहे.

त्यामुळे RCBच्या मनात नक्की चाललंय का, याचा अंदाज नेटिझन्स घेऊ लागले. पण, हे सर्व करताना RCBनं कर्णधार विराट कोहलीला विश्वासात घेतलं नसल्याचं चित्र आता समोर आलं आहे. विराट कोहलीनं ट्विट करून आपण अनभिज्ञ असल्याचं सांगितलं. त्यावरून कोहली या निर्णयावर नाराज असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

बुधवारी RCBनं त्यांच्या ट्विटर, इस्टाग्राम आणि फेसबुक अकाऊंटवरील प्रोफाईल फोटो म्हणून ठेवलेला लोगो अचानक काढला. शिवाय त्यांनी RCBहे नाव न ठेवता केवळ रॉयल चॅलेंजर्स असंच ठेवल्यानं चर्चांना उधाण आलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार RCBत्यांच्या नावात ‘Bangalore’ याऐवजी आता ‘Bengaluru’ असं लिहीणार आहे आणि 16 फेब्रुवारीला याची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. आता नावात बदल केल्यानंतर तरी RCBचं नशीब उजळणार का, असा सवाल नेटिझन्स विचारत आहेत.

टॅग्स :विराट कोहलीजसप्रित बुमराहभारत विरुद्ध न्यूझीलंड