Join us  

बुमराह, मानधना बनले विस्डेन इंडियाचे ‘सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू’

वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि स्टार महिला फलंदाज स्मृती मानधना हे विस्डेन इंडियाचे सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2019 9:00 AM

Open in App

बेंगळुरु : वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि स्टार महिला फलंदाज स्मृती मानधना हे विस्डेन इंडियाचे सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. पाकचा खेळाडू फखर जमां, श्रीलंकेचा दिमुथ करुणारत्ने आणि अफगानिस्तानचा राशिद खान यांचीही आशियातून या पुरस्कारासाठी निवड झाली.

मानधना ही सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूचा पुरस्कार जिंकणारी तिसरी भारतीय खेळाडू ठरली. याआधी मिताली राज आणि दिप्ती शर्मा यांनी हा पुरस्कार मिळाला होता. त्याचवेळी, गुंडप्पा विश्वनाथ आणि लाला अमरनाथ यांचा समावेश ‘विस्डेन इंडिया हॉल आॅफ फेम’मध्ये करण्यात आला. भारतीय क्रिकेट संघाच्या इतिहासाची नोंद असलेल्या प्रशांत किदाम्बी यांच्या ‘क्रिकेट कंट्री’ या पुस्तकाची ‘सर्वोत्कृष्ट पुस्तक’ म्हणून निवड करण्यात आली. 

दुखापतग्रस्त हार्दिक पंड्या आणि जसप्रीत बुमरा यांच्याबद्दल बीसीसीआयचे अपडेट, कधी खेळणार जाणून घ्या...

मुंबई : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा आणि अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या यांना काही दिवसांपूर्वी दुखापत झाली होती. बांगलादेशविरुद्ध जेव्हा भारताचा संघ निवडण्यात आला तेव्हा त्यांचे पुनरागमन होईल, असे वाटत होते. पण या संघात मात्र या दोघांनाही स्थान देण्यात आले नाही. त्यानंतर बीसीसीआयने या दोघांबाबत अपडेट दिले आहे.

आयपीएलमध्ये बुमराला दुखापत झाली होती. त्यानंतर तो विश्वचचषकात खेळला. पण वेस्ट इंडिज दौऱ्यात त्याला पुन्हा एकदा दुखापत झाली. ही दुखापत गंभीर असल्याचे म्हटले गेले होते. हार्दिकला आशिया चषकाच्यावेळी दुखापत झाली होती. त्यानंतर विश्वचषकात तो खेळला पण त्यानंतर पुन्हा एकदा त्याला दुखापतीने ग्रासले. पण या दोघांची दुखापत गंभीर स्वरुपाची असल्याचे कळते. कारण या वर्षात हे दोघे एकही सामना खेळणार नसल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :जसप्रित बुमराहबीसीसीआय