Join us  

Jasprit Bumrah Religion : लग्नानंतर गुगलवर शोधली जातेय जसप्रीत बुमराहची जात अन् धर्म

Is Jasprit Bumrah Sikh? भारताचा जलदगती गोलंदाज स्पोर्ट्स प्रेझेंटर संजना गणेशन ( Sanjana Ganesan) हिच्यासोबत विवाहबंधनात अडकला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 4:07 PM

Open in App

भारत-इंग्लंड ( India vs England) यांच्यातल्या चौथ्या कसोटीपूर्वी जसप्रीत बुमराहनं ( Jasprit Bumrah) BCCIकडे वैयक्तिक कारणास्तव सुट्टी मागितली. त्यानंतर जसप्रीतनं ही सुट्टी लग्नासाठी मागितल्याचे वृत्त समोर आले आणि त्याची जोडीदार कोण असेल, याबाबत अनेक तर्क लावले गेले. अखेर त्या सर्व चर्चांना सोमवारी पूर्णविराम लागला. भारताचा जलदगती गोलंदाज स्पोर्ट्स प्रेझेंटर संजना गणेशन ( Sanjana Ganesan) हिच्यासोबत विवाहबंधनात अडकला. डोक्यावर पगडी, सुंदर शेरवानी घातलेला जसप्रीत आणि सुंदर पेहेरावा केलेली संजना यांची जोडी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. पण, दुसरीकडे इंटरनेटवर जसप्रीत बुमराहची जात व धर्म ( Jasprit Bumrah Religion ) शोधला जात होता.  Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहला शुभेच्छा देताना मयांक अग्रवालनं केली चूक अन् व्हायरल झाला संजय बांगरचा फोटो

जसप्रीत बुमराह शिख आहे का?, असा ट्रेंड गुगलवर सुरू होता. तो  मूळचा कोण? शीख की आणखी कोण? अशा अनेक प्रश्नांसह बऱ्याच जणांनी त्याच्या मूळ गावाबद्दल सर्च केल्याचे गुगल सांगतेय.

 ६ डिसेंबर १९९३मध्ये जसप्रीतचा जन्म गुजरातच्या अहमदाबाद येथे झाला. तो पाच वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचे जस्बीर सिंग यांचे निधन झाले. त्यानंतर आई दलजीत बुमराह हिनं त्याचा सांभाळ केला. त्या अहमदाबाद येथील शाळेत शिक्षिका होत्या. Jasprit Bumrah Weds Sanjana Ganesan : जसप्रीत बुमराह- संजना गणेशन यांच्या लग्नाचे Unseen फोटो अन् Video

टॅग्स :जसप्रित बुमराहसंजना गणेशन