Join us  

भुंकणाऱ्या कुत्र्याला दगड मारण्यासाठी थांबलात तर... ! Jasprit Bumrah चे टीकाकारांना उत्तर देताना वादग्रस्त विधान

Jasprit Bumrah replies to his critics T20 World Cup 2022 :   प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह हा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार नसल्याचे BCCI ने सोमवारी जाहीर केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2022 6:04 PM

Open in App

Jasprit Bumrah replies to his critics T20 World Cup 2022 :   प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह हा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार नसल्याचे BCCI ने सोमवारी जाहीर केले. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी भारतीय संघाला बसलेला हा दुसरा आणि सर्वात मोठा धक्का म्हणावा लागेल. याआधी अष्टपैलू रवींद्र जडेजाने दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून बुमराहने पुनरागमन केले खरे, परंतु त्याच्या पाठीच्या दुखापतीने पुन्हा डोकं वर काढले आणि त्याला माघार घ्यावी लागली. BCCI अध्यक्ष सौरव गांगुली व मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना बुमराह खेळेल अशी आशा होती, परंतु BCCI च्या वैद्यकीय टीमने अहवाल दिला अन् धक्का बसला. 

अजिंक्य रहाणेच्या घरी पुन्हा पाळणा हलला; गोंडस बाळाने जन्म घेतला

त्यानंतर बुमराहने भावनिक ट्विट केले. त्याने लिहिले की,''ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळू न शकल्याने दुःखी झालो आहे. या कठीण काळात चाहत्यांकडून मिळालेल्या शुभेच्छा व समर्थनासाठी आभार मानतो. जसजसा बरा होईन, तसतसे मी ऑस्ट्रेलियातील भारतीय संघाच्या मोहिमेला सपोर्ट करण्यासाठी उपलब्ध असेन.'' बुमराहची ही भावनिक साद अनेकांना पटलेली नाही आणि त्यांनी त्याला ट्रोल केले. अनेकांनी तर आकडेच मांडून बुमराह आयपीएलला प्राधान्य देतो, असा आरोप केला. २०१९च्या वर्ल्ड कप स्पर्धेनंतर बुमराहने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी ६० पैकी ५९ सामने खेळले, तर भारतासाठी ७० पैकी केवळ १६ सामने खेळल्याची आकडेवारी प्रसिद्ध केली गेली.

टीकाकारांना बुधवारी जसप्रीत बुमराहने सडेतोड उत्तर दिले. त्याने इस्टा स्टोरीवर एक पोस्ट लिहिली. त्यात असे लिहिले होते की, भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्यांला दगड मारण्यासाठी जर तुम्ही थांबत असाल तर तुम्ही तुमच्या मुक्कामाकडे कधीच पोहोचू शकत नाही.

 

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२2जसप्रित बुमराह
Open in App