Join us

Jasprit Bumarah : दुखापत नाही किंवा कामाचा ताणही नाही; जसप्रीत बुमराहनं लग्नासाठी घेतलीय सुट्टी!

Jasprit Bumrah prepare for marriage चौथ्या कसोटीपूर्वी जसप्रीत बुमराह ने घेतली सुट्टी

By स्वदेश घाणेकर | Updated: March 2, 2021 23:05 IST

Open in App

भारत-इंग्लंड ( India vs England ) चौथ्या कसोटीपूर्वी प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) याने सुट्टी घेतली. BCCI ने ती मंजूर करताना त्याला रिलीज केलं आणि आता तो चौथ्या कसोटीत खेळणार नाही. त्याचा ट्वेंटी-20 मालिकेसाठी निवडलेल्या टीम इंडियातही समावेश नाही आणि तो आता वन डे मालिकेतही खेळणार नाही. त्याच्या सुट्टी मागण्यामागे दुखापत किंवा कामाचा ताण हे कारण सांगितले जात होते, पण आता खरं कारण समोर आले आहे. जसप्रीत बुमराहने लग्न करण्यासाठी ही सुट्टी घेतली आहे. तो लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. ( Jasprit Bumrah prepare for marriage) 

"लवकरच लग्न करणार असल्याचे त्याने BCCI ला कळवले आहे. या आनंदाच्या प्रसंगाच्या तयारीसाठी त्याने ही सुट्टी घेतली आहे," असे वृत्त ANI ने सूत्रांचा हवाला देऊन प्रसिद्ध केले आहे. 

 

 

टॅग्स :जसप्रित बुमराहभारत विरुद्ध इंग्लंड