Join us  

जनधन खात्याचा ज्युनिअर क्रिकेटपटूंना त्रास- बीसीसीआय

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले की, जवळजवळ सहा ज्युनिअर क्रिकेटपटूंना पुरस्कार रक्कम देताना अडचण आली. कारण त्यांचे बँक खाते जनधन योजनेंतर्गत उघडले होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 4:11 AM

Open in App

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) ज्या खेळाडूंचे बँक खाते ‘जनधन’ योजनेंतर्गंत उघडले आहे त्या खेळाडूंच्या खात्यात पुरस्कार रक्कम वळती करण्यासाठी अडचण झाली.बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले की, जवळजवळ सहा ज्युनिअर क्रिकेटपटूंना पुरस्कार रक्कम देताना अडचण आली. कारण त्यांचे बँक खाते जनधन योजनेंतर्गत उघडले होते. अशा खात्यांमध्ये जास्तीत जास्त ५० हजार रुपयांची रक्कम जमा करता येते.अधिकारी म्हणाले, ‘बीसीसीआयच्या वार्षिक कार्यक्रमात पुरस्काराचे मानकरी ठरलेल्या सर्व वयोगटातील क्रिकेटपटूंना दीड लाख रुपये देण्यात येणार होते. सिनिअर खेळाडूंच्या पुरस्कार रकमेचे हस्तांतरण ११ जानेवारी रोजी कार्यक्रमानंतर लगेच करण्यात आले होते. पण, पाच ज्युनिअर क्रिकेटपटूंच्या बँक खात्यामध्ये दीड लाख रुपयांचा व्यवहार होत नव्हता. या खात्यांमध्ये आम्ही अनेकदा रक्कम वळती करण्याचा प्रयत्न केला, पण त्यात यश आले नाही. आम्ही याबाबत आपल्या बँकेकडे चौकशी केली. त्यावेळी कळले की, या खेळाडूंचे खाते जनधन योजनेंतर्गत उघडले आहे. अशा खात्यामध्ये एकावेळी ५० हजार रुपये जमा करता येतात.त्यानंतर बीसीसीआयने तोडगा काढण्यासाठी त्यांचे खाते असलेल्या बँकेला (बँक आॅफ महाराष्ट्र) खेळाडूंचे खाते असलेल्या बँकांसोबत संपर्क करण्यास सांगितले. त्यात जनधन खात्याचे बचत खात्यामध्ये रुपांतर करण्याचा पर्याय मिळू शकतो. त्यात रक्कम जमा करण्यासाठी कुठली मर्यादा नसते.अधिकारी म्हणाले,‘तसे ज्युनिअर क्रिकेटपटूंसाठी सामना शुल्क कमी आहे. अंडर-१६ खेळाडूंना प्रति सामना १० हजार रुपये (प्रति दिन २५००) आणि अंडर-१९ खेळाडूंना ४० हजार रुपये (प्रति दिन १० हजार रुपये) मिळतात. त्यामुळे सर्वसाधारणपणे ज्यावेळी सामना शुल्क खात्यात स्थानांतरित करण्यात येते त्यावेळी कुठली अडचण येत नाही. यावेळी रक्कम अधिक असल्यामुळे अडचण आली. (वृत्तसंस्था)

टॅग्स :बीसीसीआय