'जय जवान-जय किसान, बर्थ डे दिनी युवराज सिंगचं चाहत्यांना आवाहन'

आपल्या देशातील शेतकरी आपल्या समाजाची जीवनधारा आहे. त्यामुळे, लवकरात लवकर शेतकरी प्रश्नावर चर्चेतून मार्ग निघावा. जगात अशी कुठलीच समस्या नाही, ज्यास शांतीपूर्ण चर्चेतून मार्ग काढला जाऊ शकत नाही, असे मला वाटते.

By महेश गलांडे | Published: December 12, 2020 07:51 AM2020-12-12T07:51:57+5:302020-12-12T07:52:48+5:30

whatsapp join usJoin us
'Jai Jawan-Jai Kisan, Yuvraj singh appeal to fans on his birthday' | 'जय जवान-जय किसान, बर्थ डे दिनी युवराज सिंगचं चाहत्यांना आवाहन'

'जय जवान-जय किसान, बर्थ डे दिनी युवराज सिंगचं चाहत्यांना आवाहन'

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देआपल्या देशातील शेतकरी आपल्या समाजाची जीवनधारा आहे. त्यामुळे, लवकरात लवकर शेतकरी प्रश्नावर चर्चेतून मार्ग निघावा. जगात अशी कुठलीच समस्या नाही, ज्यास शांतीपूर्ण चर्चेतून मार्ग काढला जाऊ शकत नाही, असे मला वाटते.

मुंबई - टीम इंडियाचा माजी धडाकेबाज फलंदाज युवराज सिंगचा आज जन्मदिवस आहे. सध्या देशात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या आणि कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आपण आपला वाढदिवस साजरा करणार नसल्याचे युवराजने म्हटले. तसेच, यंदाच्या वाढदिवस साजरा करण्याऐवजी देशातील शेतकरी आंदोलन आणि सरकारमध्ये सुरू असलेल्या चर्चेतून लवकरात लवकर समाधान निघावं, अशी प्रार्थना करत असल्याचं युवराजनं म्हटलं आहे. तसेच, आपल्या पत्रात जय जवान-जय किसान असा नाराही युवराजे दिलाय.

आपल्या देशातील शेतकरी आपल्या समाजाची जीवनधारा आहे. त्यामुळे, लवकरात लवकर शेतकरी प्रश्नावर चर्चेतून मार्ग निघावा. जगात अशी कुठलीच समस्या नाही, ज्यास शांतीपूर्ण चर्चेतून मार्ग काढला जाऊ शकत नाही, असे मला वाटते. मी या महान देशाचा सुपुत्र असून यापेक्षा मोठ्या अभिमानाची दुसरी गोष्ट माझ्यासाठी काहीच नाही. तसेच, देशातील कोविड 19 च्या महामारीचं संकट अद्याप टळलेलं नाही. त्यामुळे, नागरिकांनी खबरदारी घ्यायलाच हवी. कोरोना व्हायरला हरविण्यासाठी आपणास पूर्ण ताकदीने लढा द्यायचा आहे, असेही युवराजने आपल्या बर्थ डे दिनी चाहत्यांना पत्राद्वारे आवाहन केलंय.  

युवराजचा जन्म १२ डिसेंबर १९८१ रोजी चंदीगड येथे झाला. युवराज हा माजी भारतीय गोलंदाज योगराज सिंग यांचा मुलगा आहे. युवराजसिंगच्या भारतीय क्रिकेट प्रेमींना आपल्या खेळातून मोठा आनंद दिलाय. संकटसमयी संघाच्या मदतीला धाऊन येणारा टीम इंडियाच संकटमोचक म्हणून युवराजला ओळखलं जात. एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेटमध्ये युवराजने धडाकेबाज खेळीतून चाहत्यांची मने जिंकली आहेत. इंग्लंडविरुद्ध 6 चेंडूत 6 षटकार ठोकण्याचा विक्रमही युवराजने केला आहे. 

एका विश्वकप स्पर्धेत ३०० धावा फटकावणारा पहिला अष्टपैलू खेळाडू.
२००७ मध्ये भारतीय वन-डे संघाच्या उपकर्णधारपदी नियुक्ती
२०१४ मध्ये एफआयसीसीआयतर्फे मोस्ट इन्स्पायरिंग स्पोर्ट्स पर्सन ऑफ द इयर पुरस्कराचा मानकरी.
 

Web Title: 'Jai Jawan-Jai Kisan, Yuvraj singh appeal to fans on his birthday'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.