Join us
Daily Top 2Weekly Top 5

सर्वच क्रिकेटमध्ये खेळायची इच्छा : जडेजा

फिरकीपटू रवींद्र जडेजा हा क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत भारताचे प्रतिनिधित्व करण्यास इच्छुक आहे; कारण त्याच्या मते, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वत:ला चांगल्या फॉर्ममध्ये ठेवण्यासाठी केवळ कसोटी क्रिकेटच खेळणे पुरेसे नाही.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 03:44 IST

Open in App

लंडन : फिरकीपटू रवींद्र जडेजा हा क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत भारताचे प्रतिनिधित्व करण्यास इच्छुक आहे; कारण त्याच्या मते, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वत:ला चांगल्या फॉर्ममध्ये ठेवण्यासाठी केवळ कसोटी क्रिकेटच खेळणे पुरेसे नाही.जडेजाने पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी ५७ धावांत एक बळी घेतला होता. हा त्याचा मालिकेतील पहिला सामना आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर जडेजा म्हणाला, की माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी भारतासाठी खेळत आहे. मी चांगला खेळत राहिलो तर सर्वच प्रकारांत खेळेन. मला संधी मिळाली तर त्याचा फायदा उठवत चांगले प्रदर्शन करण्याचे मात्र लक्ष्य आहे. जेव्हा तुम्ही केवळ एकाच प्रकारात खेळता तेव्हा तुमच्यासाठी कठीण होते; कारण या दोघांमध्ये खूप अंतर असते. आंतरराष्ट्रीयस्तरावर तुमचा अनुभव आणि लय कमी होते. यासाठी तुम्हाला स्वत:ला प्रेरित करीत राहावे लागते. जेव्हाही तुम्हाला संधी मिळते; जशी मला या सामन्यात मिळाली. आपल्यातील क्षमतेच्या हिशेबाने मैदानावर सर्वाेत्कृष्ट प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करावा लागतो. मी संधी मिळाली तेव्हा फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीकडून योगदान देण्याचा प्रयत्न करीत असतो. मी संघाचा विश्वस्त सदस्य आणि अष्टपैलूचे स्थान मिळवू इच्छितो. मी यापूर्वीही असे केलेले आहे. हे माझ्यासाठी नवे नाही. केवळ एक वेळेची गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही खराब वेळेतून जात असता तेव्हा तुम्हाला आपला फॉर्म परत मिळविण्यासाठी प्रयत्न करावे लागतात.

टॅग्स :क्रिकेट