दडपणाचे ओझे पेलवत नाही, असा काळ येतोच...!; विराट कोहलीच्या कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयाला शाहिद आफ्रिदीचा पाठिंबा

Shahid Afridi on Virat Kohli Decision - विराट हा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं सर्वाधिक ६८ पैकी ४० विजय मिळवले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 12:56 PM2022-01-18T12:56:27+5:302022-01-18T12:57:20+5:30

'It's Time He Enjoys his Cricket': Shahid Afridi Backs Virat Kohli's Decision to Quit India's Test Captaincy | दडपणाचे ओझे पेलवत नाही, असा काळ येतोच...!; विराट कोहलीच्या कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयाला शाहिद आफ्रिदीचा पाठिंबा

दडपणाचे ओझे पेलवत नाही, असा काळ येतोच...!; विराट कोहलीच्या कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयाला शाहिद आफ्रिदीचा पाठिंबा

Next

विराट कोहलीनं कसोटी संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला अन् एका यशस्वी पर्वाचा शेवट झाला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका गमावल्यानंतर २४ तासांत विराटनं सोशल मीडियावर हा बॉम्ब टाकला. विराट हा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं सर्वाधिक ६८ पैकी ४० विजय मिळवले आहेत. ऑस्ट्रेलियात मिळवेला ऐतिहासिक कसोटी मालिका विजय, हा विराटच्याच नेतृत्वाखाली अनुभवायला मिळाला. घरच्या मैदानावर खेळलेल्या ११ पैकी ११ कसोटी मालिका भारतानं जिंकल्या. आता विराटच्या राजीनाम्यानंतर येणाऱ्या नव्या कर्णधारावर ही यशोगाथा अशीच पुढे सुरू ठेवण्याचं आव्हान असणार आहे.

विराट कोहलीनं मागच्यावर्षी ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व सोडले. त्यानंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी बीसीसीआयनं त्याची वन डे संघाच्या कर्णधारपदावरूनही हकालपट्टी केली. त्यामुळे ३३ वर्षीय विराट नाराज होता आणि त्यामुळेच त्यानं कसोटी संघाचे नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. आता कर्णधारपदाचे कोणतेही ओझे खांद्यावर नसलेला विराट धावांचा पाऊस पाडण्यासाठी सज्ज आहे. त्यामुळे अनेकांना आता पुन्हा तोच जुना रन मशीन विराट पाहायला मिळेल, अशी अपेक्षा आहे.

पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी ( Shahid Afridi) यानंही विराटच्या या निर्णयावर मत व्यक्त केलं आहे. Sama TV वर बोलताना माजी अष्टपैलू खेळाडूनं विराटच्या निर्णयाला समर्थन दिले. तो म्हणाला,''माझ्या मते हा योग्य निर्णय आहे.  विराटनं भारताचे बऱ्याच सामन्यात नेतृत्व सांभाळले आहे आणि कर्णधारपद सोडण्याचा त्याचा निर्णय योग्य असल्याचे मला वाटते. कारकीर्दित एक काळ असा येतो की तुम्हाला दडपणाचे ओझे पेलवत नाही आणि  त्याचा तुमच्या वैयक्तिक कामगिरीवर परिणाम होतो. त्यानं प्रदीर्घ काळ कर्णधारपद भूषविले आणि सर्वोत्तम कामगिरी केली. आता एक फलंदाज म्हणून त्याच्या खेळाचा आस्वाद लुटण्याची वेळ आली आहे.''


विराटनं कसोटी संघाचे कर्णधारपद हाती घेतलं, तेव्हा भारतीय संघ आयसीसी क्रमवारीत ७व्या क्रमांकावर होता आणि आज जेव्हा त्यानं ही जबाबदारी सोडली तेव्हा भारत अव्वल स्थानावर आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा कर्णधार म्हणून विराटनं २१३ पैकी १३५ सामने जिंकले आहेत. त्यात त्यानं ५९.९२च्या सरासरीनं १२,८८३ धावा केल्या आहेत आणि त्यात ४१ शतकांचा समावेश आहे.
 

Web Title: 'It's Time He Enjoys his Cricket': Shahid Afridi Backs Virat Kohli's Decision to Quit India's Test Captaincy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app