Join us

It's just a game!; चेन्नई सुपर किंग्सचे IPL 2020मधील आव्हान संपुष्टात आल्यानंतर साक्षी धोनीची भावनिक पोस्ट

चेन्नई सुपर किंग्सला ( Chennai Super Kings) आयपीएलच्या इतिहासात प्रथमच प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्यात अपयश आले.

By स्वदेश घाणेकर | Updated: October 26, 2020 07:15 IST

Open in App

चेन्नई सुपर किंग्सला ( Chennai Super Kings) आयपीएलच्या इतिहासात प्रथमच प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्यात अपयश आले. चेन्नईनं आयपीएलच्या १० मोसमात प्ले ऑफमध्ये प्रवेश केला. त्यापैकी २०१०, २०११ व २०१८ मध्ये तर त्यांनी जेतेपदाचा चषक उंचावला. २०१२, २०१३, २०१५ आणि २०१९मध्ये त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. अशा यशस्वी संघाला २०२०मध्ये प्ले ऑफमध्ये प्रवेश करता न येणं, हे धक्कादायक आहे. Indian Premier League ( IPL 2020) च्या १३व्या पर्वात CSKकडून चुका झाल्या. त्यामुळे त्यांच्यावर टीका होताना दिसत आहे. पण, पती महेंद्रसिंग धोनीच्या ( MS Dhoni) संघावर होत असलेल्या टीकेला साक्षी धोनीनं ( Sakshi Dhoni) उत्तर देण्याचा प्रयत्न केला. तिनं एक भावनिक पोस्ट लिहून संघाचे मनोबल उंचावण्याचा प्रयत्न केला आणि CSKने तिचे आभारही मानले.  राजस्थान रॉयल्सनं रविवारी मुंबई इंडियन्सवर दणदणीत विजय मिळवून चेन्नई सुपर किंग्सला Play Offच्या शर्यतीतून अधिकृतपणे बाहेर फेकले आहे. RRनं १२ सामन्यांत ५ विजयासह १० गुणांची कमाई केली आहे. चेन्नईनं तितक्याच सामन्यात ८ गुण कमावले आहेत आणि आता त्यांना काही केल्यास प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळवता येणार नाही. त्यांनंतर साक्षीनं एक पोस्ट लिहिली. त्यात ती म्हणते,''हा फक्त खेळ आहे... तुम्ही कधी जिंकता, तर कधी हरता. मागील अनेक वर्ष तुम्ही चाहत्यांना आनंददायी क्षण अनुभवण्यास दिले, तसेच काही पराभवही पत्करलेत. काही वेळा जिंकलात, काही वेळा हरलात आणि काही वेळा संधी चुकलात... हा फक्त खेळ आहे...!'' दरम्यान, रविवारी चेन्नई सुपर किंग्समधील ( Chennai Super Kings) स्पार्क अखेर पाहायला मिळाला. गोलंदाजांच्या उल्लेखनीय कामगिरीनंतर ऋतुराज गायकवाड आणि अंबाती रायुडू यांनी दमदार खेळ करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Banglore) संघाला पराभूत केले.  ऋतुराजच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर चेन्नईनं हा सामना ८ विकेट्स राखून जिंकला. RCBनं २० षटकांत ६ बाद १४५ धावा केल्या. CSKकडून सॅम कुरननं १९ धावांत ३, तर दीपक चहरनं दोन विकेट्स घेतल्या.

प्रत्युत्तरात फॅफ ड्यू प्लेसिस आणि ऋतुराज गायकवाड यांनी चेन्नईला ४६ धावांची सलामी मिळवून दिली. ख्रिस मॉरिसनं सहाव्या षटकात १३ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह २५ धावा करणाऱ्या फॅफला बाद केले.  संयमी खेळ करताना ऋतुराजनं अनुभवी फलंदाज अंबाती रायुडूसह दुसऱ्या विकेटसाठी ६७ धावांची भागीदारी केली. रायुडू २७ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ३९ धावांवर युझवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. ऋतुराजनं ४२ चेंडूंत आयपीएलमधील पहिले अर्धशतक पूर्ण केले. ऋतुराजनं ५१ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकार  खेचून नाबाद ६५ धावा केल्या, तर महेंद्रसिंग धोनी १९ धावांवर नाबाद राहिला. चेन्नईनं १८.४ षटकांत २ बाद १५० धावा करून सामना जिंकला.  

टॅग्स :IPL 2020महेंद्रसिंग धोनीचेन्नई सुपर किंग्स