Join us  

धोनीला खेळताना बघणे शानदार असेल - वीरेंद्र सेहवाग

यंदा आयपीएल भारताबाहेर संयुक्त अरब अमिरातमध्ये होत आहे. आयपीएलची सुरुवात १९ सप्टेंबरपासून होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2020 12:17 AM

Open in App

मुंबई : यंदाची इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) फार विशेष होण्याची आशा असून त्याचे एक मुख्य कारण वर्षभराच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर महेंद्रसिंग धोनी मैदानावर परतणे हे आहे, असे मत भारताचा माजी सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवागने व्यक्त केले.यंदा आयपीएल भारताबाहेर संयुक्त अरब अमिरातमध्ये होत आहे. आयपीएलची सुरुवात १९ सप्टेंबरपासून होत आहे. सेहवाग म्हणाला, ‘माझ्या मते, ही स्पर्धा प्रत्येक खेळाडू व त्याचसोबत प्रेक्षकांसाठी विशेष राहील. धोनीला पुन्हा एकदा खेळपट्टीवर बघणे निश्चितच आनंददायी असेल. बरेच काही घडणार आहे, यापेक्षा मला अधिक काही सांगण्याची गरज आहे?आॅगस्टमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करण्याच्या आपल्या निर्णयामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का देणारा धोनी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाचे नेतृत्व करणार आहे. (वृत्तसंस्था)रैनाची अनुपस्थिती चिंतेचा विषयसुरेश रैनाची अनुपस्थिती सीएसकेसाठी चिंतेचा विषय ठरेल.या संघात बरेचजण उजव्या हाताने फलंदाजी करणारे आहेत. त्यामुळे त्यांना रैनाची नक्की उणीव भासेल, असे मत आॅस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू डीन जोन्सने व्यक्त केले.

टॅग्स :आयपीएल 2020