शारजाहच्या लहान मैदानावर आज पुन्हा धावांचा पाऊस शक्य

केकेआरविरुद्ध दिल्ली लढतीत उभय संघांच्या फलंदाजांवर नजर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2020 06:10 AM2020-10-03T06:10:29+5:302020-10-03T06:11:20+5:30

whatsapp join usJoin us
It may rain again today on the small field of Sharjah | शारजाहच्या लहान मैदानावर आज पुन्हा धावांचा पाऊस शक्य

शारजाहच्या लहान मैदानावर आज पुन्हा धावांचा पाऊस शक्य

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

शारजाह : कोलकाता नाईटरायडर्स (केकेआर) आणि दिल्ली कॅपिटल्स संघांदरम्यान शनिवारी शारजाहतील अपेक्षेने छोट्या असलेल्या मैदानात खेळल्या जाणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) सामन्यात नजरा उभय संघांतील फलंदाजांच्या कामगिरीवर राहील. सामन्यात धावांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. कारण येथील सीमारेषा तुलनेने लहान आहे. केकेआरला हळूहळू सूर गवसत असल्याचे संकेत मिळाले आहेत तर दिल्ली संघाला गेल्या लढतीत पराभवाला सामोरे जावे लागले होते.

गेल्या लढतीत केकेआरचे युवा वेगवान गोलंदाज कमलेश नागरकोटी व शिवम मावी यांनी शानदार कामगिरी केली होती, पण येथे त्यांची खरी परीक्षा असेल. येथील खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल आहे. केकेआर कदाचित आपल्या विजयी संघाता कुठला बदल न करण्याची शक्यता आहे. रसेलने राजस्थान रॉयल्सविरुद्ध गेल्या लढतीत दुबईतील मोठ्या मैदानावर तीन षटकार ठोकत सूर गवसल्याचे संकेत दिले. पंतला मात्र अद्याप नैसर्गिक खेळ दाखविता आला नाही. पंतवर दडपणही असेल. कारण केएल राहुल, ईशान किशन आणि संजू सॅमसन हे त्याचे प्रतिस्पर्धी शानदार कामगिरी करीत आहेत.

केकेआर संघात शुभमान गिल, आंदे्र रसेल, इयोन मॉर्गन यांच्यासारखे फलंदाज मोठे फटके खेळण्यास सक्षम आहेत. दिल्ली संघात ही भूमिका बजावण्यासाठी मार्कस स्टोईनिस, पंत, श्रेयस अय्यर आहेत. सलामीला अपयशी ठरलेला सुनील नारायणच्या स्थानी राखीव सलामीवीर टॉम बँटमला संधी मिळणार का, याबाबत उत्सुकता आहे.

केकेआर । रसेलला सूर गवसला आहे. शुभमान गिल व मॉर्गनसारख्या फलंदाजांची उपस्थिती. शिवम मावी व कमिन्स यांची शानदार कामगिरी.
दिल्ली । स्टोईनिस, धवन, पृथ्वी शॉ आणि श्रेयस अय्यर यांची उपस्थिती. गोलंदाज रबाडा व अमित मिश्रा चांगल्या फॉर्मात आहेत.

केकेआर । सुनील नारायण पहिल्या तीन सामन्यांत सलामीवीर म्हणून अपयशी. कर्णधार कार्तिक स्वत: आऊट आॅफ फॉर्म. त्यामुळे मधल्या फळीवर दबाव येत आहे.
दिल्ली । ऋषभ पंत आपला नैसर्गिक खेळ करण्यात अपयशी. शिमरोन हेटमायरला अद्याप विशेष छाप सोडता आलेली नाही. सनरायजर्सविरुद्ध गेल्या लढतीत पराभव स्वीकारावा लागल्यामुळे संघाचे मनोधैर्य प्रभावित.

Web Title: It may rain again today on the small field of Sharjah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.