Join us  

"विजय मिळवण्याच्या प्रयत्नांत पराभव झाला तरी हरकत नाही..."

विराटची सकारात्मकवृत्ती पाहून मी फार प्रभावित झालो.  विराट मला कृतसंकल्प वाटला. असेही जाणवले की तो पैलू पाडता येणार नाही, असा ‘बहुमोल हिरा’ आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 11:23 AM

Open in App

- अयाज मेमन, कन्सल्टिंग एडिटर विराट कोहलीने कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले. माजी कोच रवि शास्त्री यांच्यासोबत त्याचे चांगले ‘ट्यूनिंग’ होते. दोघांच्या रणनीतीमुळे टीम इंडियाने अनेक शानदार उपलब्धी मिळविली. रवि शास्त्री आणि ‘लोकमत’चे कन्सल्टिंग एडिटर तसेच क्रिकेटतज्ज्ञ अयाज मेमन यांच्या ‘स्टार गेंजिंग : द प्लेयर्स इन माय लाइफ’ या पुस्तकात कोहलीवर लिहिलेल्या लेखातील संपादित अंश असे...उत्कृष्टता आणि सातत्याचा ताळमेळभारताच्या १९ वर्षांखालील संघाचा सदस्य राहिल्यापासून कोहलीने स्वत:च्या प्रतिभेची छाप सोडली. योग्यवेळेआधी आंतरराष्ट्रीय स्तरावर चमक दाखविणे अनेकदा दुधारी शस्त्रासारखे ठरते. काही खेळाडू अपयशातून धडा घेतात आणि शकतात तर काहीजण थोड्याशा अपयशातून घाबरतात. कोहली हार मानणाऱ्यांपैकी नव्हता. स्पष्टच बोलायचे तर कोहलीसोबत उत्कृष्ट आणि सातत्यपूर्ण ताळमेळ साधण्याची गरज होती. विराट म्हणजे बहुमोल हिराकोच या नात्याने कोहलीमध्ये मी परिस्थितीला सामोरे जाण्याची भूक पाहिली. संचालक या नात्याने वन डे मालिकेदरम्यान टीम इंडियासोबत जुळल्यापासून विराटसोबत  मोठा काळ घालविण्याची संधी लाभली. विराटची सकारात्मकवृत्ती पाहून मी फार प्रभावित झालो.  विराट मला कृतसंकल्प वाटला. असेही जाणवले की तो पैलू पाडता येणार नाही, असा ‘बहुमोल हिरा’ आहे. विजयापेक्षा काहीही मान्य नव्हते काही खेळाडू झेप घेण्यात यशस्वी होतात, तर काही अपयशी. मैदानावर विराट पूर्णपणे ‘फोकस्ड’ आणि प्रचंड प्रतिस्पर्धी असायचा. तो जे करणार असेल ते त्याच्या देहबोलीतून दिसायचे. विराटमध्ये हा गुण जन्मजात असावा. धोनीकडून कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून विराट अधिक परिपक्व होत गेला. धोनी हा कठीण परिस्थितीतही शांतचित्त असायचा, संयम दाखवायचा. विराटचा दृष्टिकोण सेनापतीसारखा राहिला. आम्हा दोघांना विजयापेक्षा काहीही मान्य नव्हते. विजय मिळविण्याच्या प्रामाणिक प्रयत्नात आम्ही पराभवदेखील मान्य करू शकत होतो.एक जान है हम!अनेकजण मला नेहमी विचारणा करतात की, विराट आणि तुमच्यात इतके निकटचे (आत्मीय) संबंध कसे? मला माहिती नाही. मी कोहलीपेक्षा किमान २५ वर्षांनी मोठा आहे.  आमच्या दोघांची भावना, समर्पण आणि आयुष्यात आनंद साजरा करण्याची तऱ्हा  वेगळी असली तरी क्रिकेटबाबत बोलायचे तर आम्हा दोघांची विचार करण्याची वृत्ती एकसारखीच आहे.कसोटी क्रिकेटचा अमूल्य दूतविराटने ७०हून अधिक आंतरराष्ट्रीय शतके ठोकली आहेत. तो अशाच प्रकारे धडाका दाखवित राहिल्यास अनेक विक्रमांना गवसणी घालेल. कसोटी क्रिकेटची लोकप्रियता वाढविणारा आणि या प्रकाराचा सर्वदूर प्रचार करणारा तो खऱ्या अर्थाने दूत आहे. माझ्या मते विराट कोहली हा या शतकात क्रिकेटला लाभलेले सर्वांत मोठे वरदान आहे. प्रत्येक प्रकारात ५०हून अधिक सरासरी मैदानावर विराट पूर्णपेणे वेगळी व्यक्ती असते. तो रिलॅक्स आणि शांत असतो. विजयाचा जल्लोषही असा साजरा करतो की, पुढील सामन्याच्या तयारीत कुठलाही अडथळा येणार नाही, याची काळजी घेतो. विराटने हजारो धावा कुटल्या. कसोटी, वनडे आणि टी-२० या तीनही प्रकारात त्याची सरासरी ५०हून अधिक आहे.  ही एक अभूतपूर्व उपलब्धी असावी.  विराटच्या फलंदाजीत जे कौशल्य आणि करिष्मा पाहायला मिळतो ती त्याच्या व्यक्तिमत्त्वाची झलक असते. मनगटाच्या बळावर मारलेले ताकदवान फटके, पूल आणि ड्राईव्ह, बॉटम हॅन्ड आणि त्यातही कव्हर ड्राईव्हचे फटके सर्वकाही अप्रतीम असा नजराणा असतो.                                                     (साभार- हार्पर कोलिन्स इंडिया)

टॅग्स :विराट कोहलीरवी शास्त्री
Open in App