Join us  

IPL2020: कोहलीकडून झालेल्या चुकीनंतर सचिनची ‘मास्टर’ प्रतिक्रिया

नाणेफेक जिंकून आरसीबी कर्णधार कोहलीने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2020 1:18 PM

Open in App

मुंबई : दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) यंदाच्या Indian Premier League (IPL 2020) मध्ये पुन्हा एकदा गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावताना सोमवारी रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला (Royal Challengers Banglore) ५९ धावांनी नमवले. दिल्लीने सांघिक खेळाचे प्रदर्शन करताना सहज बाजी मारली. त्याचवेळी भल्यामोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना कर्णधार विराट कोहलीचा (Virat Kohli) अपवाद वगळता आरसीबीच्या इतर कोणत्याही फलंदाजाला खेळपट्टीवर तग धरता आला नाही. या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना कोहलीकडून नकळतपणे एक चूक होता होता राहिली. यामुळे त्याला बंदीच्या कारवाईलाही सामोरे जावे लागले असते. मात्र त्याने वेळीच स्वत:ला सावरले आणि यावर आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही (Sachin Tendulkar) कमेंट केली आहे.

नाणेफेक जिंकून आरसीबी कर्णधार कोहलीने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. मात्र दिल्लीच्या पृथ्वी शॉने जबरदस्त फटकेबाजी करत आरसीबीवर दबाव आणला. यावेळी तिसऱ्या षटकात पृथ्वीने मारलेला जोरदार फटका कोहलीने अडवला आणि त्याने नकळतपणे चेंडूला लाळ लावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला आपण करत असलेली चूक कळाली आणि लगेच हात झटकले. यावेळी त्याची रिअ‍ॅक्शन पाहून सचिन तेंडुलकरनेही ट्वीट केले आहे.

चेंडूला लाळ लावण्यापासून थोडक्यात वाचलेल्या कोहलीने नंतर दोन्ही हात उंचावून स्मितहास्य केले. कोरोना महामारीमुळे सध्या आयसीसीच्या नियमानुसार कोणत्याही क्रिकेट सामन्यात चेंडूला लाळ लावण्यास बंदी आहे. यावर आता सचिननेही ट्वीट केले आहे. सचिनने म्हटले की, ‘पृथ्वीने अविश्वसनीय फटका मारला. चेंडूला लाळ लावण्यापासून थोडक्यात दूर राहिल्यनंतर विराट कोहलीकडून मिलियन डॉलरची रिअ‍ॅक्शन मिळाली.’ 

टॅग्स :विराट कोहलीसचिन तेंडुलकरबीसीसीआयIPL 2020