Join us  

IPL 2020 : इतिहास सांगतो, कर्णधार बदलल्याने संघाचे नशिब बदलत नाही

कोलकाता नाईट रायडर्सने (KKR).आयपीएल 2020 (IPL 2020)  मध्ये आपला कर्णधार बदलला.पहिल्या सात पैकी तीन सामने गमावल्यावर दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik)  नेतृत्वाची धुरा ईयॉन मॉर्गनकडे (Eoin Morgan)  सोपवली पण केकेआरच्या (KKR)  निकालात काही फरक पडला नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2020 6:15 PM

Open in App

-ललित झांबरे 

कोलकाता नाईट रायडर्सने (KKR).आयपीएल 2020 (IPL 2020)  मध्ये आपला कर्णधार बदलला.पहिल्या सात पैकी तीन सामने गमावल्यावर दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik)  नेतृत्वाची धुरा ईयॉन मॉर्गनकडे (Eoin Morgan)  सोपवली पण केकेआरच्या (KKR)  निकालात काही फरक पडला नाही. मुंंबई इंडियन्सकडून (MI)  त्यांनी एकतर्फी हार पत्करली. 

आयपीएलच्या इतिहासात स्पर्धेदरम्यान नेतृत्वबदलाची ही काही पहिलीच वेळ नाही. अगदी पहिल्या सिझनपासून आतापर्यंत संघ आपले कर्णधार बदलत आले आहेत. पण या बदलात यश फक्त मुंबई इंडियन्सच्या रोहित शर्माच्याच (Rohit Sharma) वाट्याला आले आहे. 

2008- डेक्कन चार्जर्स- व्हिव्हिएस लक्ष्मण कडून अॅडम गिलख्रिस्टकडे डेक्कन चार्जर्सने पहिल्या सहा पैकी पाच सामने गमावलेल्या लक्ष्मणवर नशिब रुसले होते. त्यात त्याला दुखापत झाली आणि पुढे खेळू शकणार नसल्याने  कर्णधारपद गिलख्रिस्टकडे सोपवले गेले पण फार फरक पडला नाही. आठ संघात ते शेवटच्या स्थानी राहिले. पुढच्या सिझनमध्ये मात्र गिलख्रिस्टने डेक्कनला थेट चॅम्पियन बनवले.पहिल्या सिझनमध्येच मुंबईचे कर्णधार हरभजन सिंग, शॉन पोलॉक व सचिन तेंडूलकर असे बदलले. हरभजनवर थप्पड प्रकरणात बंदी आली तर सुरुवातीला सचिन जायबंदी होता. 

2009- रॉयल चॅलेंजर्स- केव्हिन पीटरसनकडून अनिल कुंबळेकडेकेव्हिन पीटरसन त्यावर्षीचा सर्वात महागडा खेळाडू होता पण कर्णधार म्हणून तो फेल ठरला. पहिल्या सहा सामन्यानंतरच खराब कामगिरीमुळे त्याचे कर्णधारपद काढून घेण्यात आले आणि अनिल कुंबळेने नेतृत्व केले आणि संघ उपविजेतेपदापर्यंत पोहोचला.  

2012- डेक्कन चार्जर्स- कुमार संगकाराकडून कॅमेरॉन व्हाईटकडेसगकाराच्या नेतृत्वात डेक्कनने पहिल्या सात पैकी सहा सामने गमावले. स्वतः संगकाराच्या धावा होत नव्हत्या म्हणून आठव्या सामन्यात तो स्वतःहूनच संघाबाहेर बसला आणि कॅमेरॉन व्हाईट कर्णधार बनला. मात्र तारीसुध्दा डेक्कनच्या नशिबात पराभवच होते. पुढच्या नऊ पैकी सहा सामने त्यांनी गमावले आणि शेवटून दुसऱ्या स्थानी राहिले. पुढल्या वर्षी डेक्कनचे नामकरण सनरायजर्स झाले. 

2012- रॉयल चॅलेंजर्स - डॅनियल व्हेट्टोरीकडून विराट कोहलीकडेडॅनीयल व्हेट्टोरीनेही आठव्या सामन्यात स्वतःला बाहेर बसवले. आणि विराट कोहलीकडे नेतृत्व आले.त्यावर्षी आरसीबीचा संघ पाचव्या स्थानी राहिला आणि तेंव्हापासून आतापर्यंत कर्णधारपद विराटकडेच कायम आहे. एखाद्या संघाचे सलग सिझनमध्ये नेतृत्व करण्याचा हा विक्रम आहे.

2013- मुंबई इंडियन्स- रिकी पोंटींगकडून रोहित शर्माकडेसातव्या सामन्यात नेतृत्वबदल घडला. पोंटींग दोन वेळचा विश्वविजेता कर्णधार असला तरी त्याची जादू चालत नव्हती. धावाही होत नव्हत्या.सहा डावात फक्त,52 धावाच तो करु शकला. शेवटी त्याने स्वतःला संघाबाहेर ठेवले आणि रोहित शर्मा कप्तान बनला, सोबतच मुंबई इंडियन्सचे नशिब बदलले. पुढच्या 13 पैकी 10 सामने जिंकत त्यांनी थेट विजेतेपदावरच नाव कोरले आणि रोहित पदार्पणातच चॅम्पियन कर्णधार बनला. 

2013- सनरायजर्स हैदराबाद - शिखर धवनकडून डॅरेन सॅमीकडेधवनच्या बॅटीतील धावा आटल्यानंतर 11 व्या सामन्यात बदल घडला. 10 पैकी सहा सामने त्यांनी गमावलेले होते. धवनच्या धावा 215 च होत्या. सॅमी कर्णधार बनल्यावर चार पैकी दोन सामने त्यांनी जिंकले पण स्थान सहावेच राहिले. 

2015- राजस्थान रॉयल्स - शेन वॉटसनकडून स्टिव्ह स्मिथकडे मूळ कर्णधार शेन,वॉटसन होता पण दुखापतीमूळे तो सुरुवातीचे सामने खेळू शकला नाही. नंतर जेंव्हा तो तंदुरुस्त झाला तेंव्हा त्याने स्मिथकडेच नेतृत्व कायम राहू दिले. त्यावर्षी रॉयल्सचा संघ प्ले,ऑफ खेळला होता. 

2016- किंग्ज इलेव्हन- डेव्हिड मिलरकडून मुरली विजयकडे किंग्ज इलेव्हनसाठी त्या मोसमात मिलर हा नवाच कर्णधार होता. पण पहिल्या सहा सामन्यात ते एकच जिंकू शकले. स्वतः मिलर सहा सामन्यात फक्त 70 धावा करु शकला. सातव्या सामन्यात मुरली विजय कर्णधार बनला. पुढच्या सात पैकी त्यांनी तीन सामने जिंकले तरी किंग्ज इलेव्हनला शेवटच्या स्थानी समाधान मानावे लागले. 

2018- दिल्ली डेअरडेविल्स- गौतम गंभीरकडून श्रेयस अय्यरकडेगंभीर केकेआरचा चॅम्पियन कर्णधार होता पण 2018 च्या सिझनसाठी त्यांनी त्याला मोकळे केले आणि गंभीर आपल्या घरच्या संघाकडे आला. मात्र पहिल्या सहा सामन्यात त्याच्या फक्त 88 धावा बनल्या आणि संघाने सहा पैकी पाच सामने गमावले. त्यानंतर गंभीरने स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेत नेतृत्व सोडत असल्याची घोषणा केली आणि श्रेयस अय्यरकडे 23 वर्ष वयातच कर्णधारपद आले. मात्र त्यावर्षी दिल्लीचा संघ प्ले आॕफसुध्दा गाठू शकला नाही.

2019- राजस्थान रॉयल्स- अजिंक्य रहाणे कडून  स्टिव्ह स्मिथकडेदोन वर्षाच्या निलंबनानंतर 2018 मध्ये रॉयल्स परतले पण बॉल टेम्परिंगमुळे बंदी असल्याने स्टिव्ह स्मिथ उपलब्ध नव्हता. म्हणून रहाणे कर्णधार बनला. 2019 मध्येही तोच होता पण आठ पैकी सहा सामने गमावल्यावर राॕयल्सने नेतृत्वबदलाचा निर्णय घेतला. स्टिव्ह स्मिथ पुन्हा कर्णधार बनला. पुढच्या पाच पैकी तीन सामने त्यांनी जिंकले मात्र सातव्या स्थानी राहिले. आता यंदा राॕयल्सची कामगीरी खराब होतेय. आठपैकी तीनच सामने ते जिंकू शकले आणि शेवटून दुसऱ्या स्थानी आहेत. म्हणून स्टिव्ह स्मिथचे कर्णधारपद धोक्यात आहे आणि जोस बटलरच्या नेतृत्वाच्या संधीची चर्चा आहे. 

2020- कोलकाता नाईट रायडर्स - दिनेश कार्तिककडून इयान मॉर्गनकडेकोलकाता नाईट रायडर्सने सात पैकी तीन सामने गमावले. कामगिरी एवढी खराब नव्हती पण दिनेश कार्तिकची बॕट चालत नव्हती आणि त्याच्या नेतृत्वाबद्दलही सुरुवातीपासुनच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. शेवटी त्याने स्वतःच कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली आणि उपकर्णधार इयान मर्गन कर्णधार बनला. मॉर्गन इंग्लंडचा सफल कर्णधार असला आणि हुशार कर्णधारांमध्ये गणला जात असला तरी आयपीएलमध्ये नेतृत्वाच्या पदार्पणात तो सपशेल अपयशी ठरला. मुंबईने त्यांच्यावर अगदी सहज विजय मिळवला, आता पुढच्या सामन्यांमध्ये तरी मॉर्गन आपल्या नेतृत्वाची कमाल दाखवून केकेआरचे नशिब पालटतो काय हेच बघायचे. 

टॅग्स :IPL 2020दिनेश कार्तिककोलकाता नाईट रायडर्स