Join us  

IPL2018 : कर्णधार म्हणून युवराजला 90 टक्के मते मिळाली, तरीही अश्विनचीच निवड

विरेंद्र सेहगावचा धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2018 6:39 PM

Open in App

नवी दिल्ली - आयपीएलमधील पंजाब संघाच्या कर्णधारपदाची धुरा भारताचा फिरकी गोलंदाज आर. अश्विनकडे काल सोपवण्यात आली आहे. पण याबाबत विरेंद्र सेहगावनं धक्कादायक खुलासा केला आहे . फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सेहवागनं हा खुलासा केला आहे. कर्णधारपदासाठी युवराजला 90 टक्के मते मिळाली होती.  सर्वजण युवराज सिंगला कर्णधार म्हणून खेळताना पाहू इच्छित होते. युवराज जवळ कर्णधारपदाचा अनुभव आहे. पण यावर्षी आम्ही नव्या पद्धतीनं खेळणार आहे. आम्ही अशा खेळाडूकडे कर्णधारपदाची धुरा सोपवणार होतो, त्या खेळाडूच्या कर्णधारपदाबद्दल लोकांना जास्त माहिती नसेल. 

मॅनेजमेंट आणि माझ्या मते आर. अश्विन याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्याचा विचार होता. युवराज आणि मी चांगले मित्र आहे. पण मैत्री आणि खेळ आपल्या जाग्यावर आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये अश्विनचा कर्णधार म्हणून रेकॉर्ड चांगला आहे. 15 सामन्यात त्यानं 12 सामने जिंकले आहेत. 

आयपीएलच्या 11 व्या मोसमासाठी यावर्षी सर्वच खेळाडूंची बोली लावण्यात आली होती.  बंगळुरुमध्ये झालेल्या लिलावात भारतीय संघातील अनुभवी अश्विनसाठी चेन्नई आणि पंजाबमध्ये चांगलीच चुरस निर्माण झाली होती. शेवटी पंजाबनं मात करत अश्विनला खरेदी केलं. अश्विनसाठी पंजाबनं 7.6 कोटी रुपयांची बोली लावली. यापूर्वी अश्विने पुणे आणि चेन्नईच्या संघाचे प्रतिनिधित्व केलं आहे.  पंजाब संघामध्ये आर. अश्निन, गेल, युवराज आणि डेविड मिलर  कर्णधारपदाच्या शर्यतित होते. पण पंजाबने कर्णधारपदाची धुरा अश्विनकडे सोपवली आहे.  

 

असा आहे पंजाब संघ - अक्षर पटेल (6.75 कोटी), रविचंद्रन अश्विन (7.6 कोटी ), युवराज सिंह (2 कोटी), करुण नायर (5.6 कोटी), लोकेश राहुल (11 कोटी), डेविड मिलर (3 कोटी), एरॉन फिंच (6.2 कोटी), मार्कस स्टोइनिस (6.2 कोटी), मयंक अग्रवाल (1 कोटी), अंकित सिंह राजपूत (3 कोटी), एंड्रू टाई (7.2 कोटी), मुजीब जादरान (4 कोटी), मोहित शर्मा (2.4 कोटी, राइट टू मैच), बरिंदर सरां (2.2 कोटी), क्रिस गेल (2 कोटी), बेन ड्वौर्शुइस (1.4 कोटी), अक्षदीप नाथ (1 कोटी), मनोज तिवारी (1 कोटी), मंजूर डार, प्रदीप साहू, मयंक डागर (20-20 लाख)  

टॅग्स :आयपीएल 2018आयपीएलविरेंद्र सेहवागआर अश्विनयुवराज सिंग