IPL Spot Fixing Scandal, Ajit Chandila: 'स्पॉट फिक्सिंग' प्रकरण: दोषी अजित चंडिलावर BCCI मेहेरबान, आजीवन बंदी उठवली!

२०१३च्या IPL मध्ये स्पॉट फिक्सिंग केल्याप्रकरणी श्रीसंतसोबतच अजितवर घालण्यात आली होती क्रिकेटबंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 11:01 AM2023-02-22T11:01:07+5:302023-02-22T11:01:49+5:30

whatsapp join usJoin us
IPL Spot Fixing Scandal in 2013 Rajasthan Royals Spinner Ajit Chandila Life Ban Reduced To Seven Years by BCCI | IPL Spot Fixing Scandal, Ajit Chandila: 'स्पॉट फिक्सिंग' प्रकरण: दोषी अजित चंडिलावर BCCI मेहेरबान, आजीवन बंदी उठवली!

IPL Spot Fixing Scandal, Ajit Chandila: 'स्पॉट फिक्सिंग' प्रकरण: दोषी अजित चंडिलावर BCCI मेहेरबान, आजीवन बंदी उठवली!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL Spot Fixing Scandal: २०१३च्या IPL दरम्यान स्पॉट फिक्सिंग प्रकरणात श्रीसंत सोबत अडकलेला अजित चंडिला गेल्या अनेक वर्षांपासून क्रिकेटपासून दूर होता. त्याच्यासोबत या प्रकरणात अडकलेले वेगवान गोलंदाज श्रीसंत आणि अंकित चव्हाण यांचे आयुष्य पुन्हा रुळावर आले. पण अजित चंडिला अजूनही क्रिकेटपासून दूर आहे. पण अखेर आता या फिरकीपटूवर दया दाखवत BCCI ने त्याला मोठा दिलासा दिला आहे. चंडिलाला क्रिकेटमध्ये परतण्याचा मार्ग भारतीय क्रिकेट निमायक मंडळ म्हणजे BCCI ने बोर्डाने खुला केला आहे.

नक्की काय होतं प्रकरण?

अंकित चव्हाण, श्रीसंत आणि अजित चंडिला हे २०१३ साली राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळत होते. या खेळाडूंवर पैसे घेऊन खेळल्याचा आरोप होता. तिघांनाही तुरुंगात पाठवण्यात आले. बीसीसीआयने या तिन्ही खेळाडूंवर आजीवन बंदी घातली होती. २०१७ मध्ये प्रथम श्रीशांत आणि नंतर अंकितवरील आजीवन बंदी उठवण्यात आली. श्रीशांत केरळ संघात परतला तर अंकितने मुंबईतील एका क्लबकडून खेळायला सुरुवात केली. आता बीसीसीआयने चंडिलालाही दुसरी संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.

BCCI ने घटवला बंदीचा कालावधी

बीसीसीआयचे लोकपाल विनीत सरन यांनी चंडिला याच्यावरील आजीवन बंदी उठवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ही बंदी सात वर्षांपर्यंत कमी केली आहे, जी २०१६ पासून लागू मानली जात होती. लोकपाल सरन यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे की, 'बीसीसीआयने १७.०५.२०१३ रोजी चंडिलाला सर्व क्रिकेट स्पर्धांतून निलंबित केले आहे. अर्जदाराविरुद्ध सुरू करण्यात आलेल्या फौजदारी कारवाईबरोबरच, मंडळाकडून त्याच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाईही सुरू करण्यात आली होती. दिनांक ०४.११.२०१९ रोजी अर्जदाराचे प्रतिनिधित्व स्वीकारण्यात आले आहे. श्रीशांत आणि अंकित चव्हाण यांच्यासह त्याच्याबद्दलही सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचे त्याचे अपील विचारात घेण्यात आले आहे. बीसीसीआय शिस्तपालन समितीच्या १८.०१.२०१६ च्या आदेशानुसार अंजित चंडिलावरील आजीवन बंदी घटवण्यात आली असून हा कालावधी आता ७ वर्षांपर्यंतचाच असेल.' त्यामुळे त्याच्यावरील बंदी जानेवारी २०२३ ला संपली असून तो लवकरच क्रिकेटमध्ये परतण्याची शक्यता आहे.

Web Title: IPL Spot Fixing Scandal in 2013 Rajasthan Royals Spinner Ajit Chandila Life Ban Reduced To Seven Years by BCCI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.