Join us  

आयपीएलचे वेळापत्रक लवकरच- ब्रिजेश पटेल

आयपीएल खेळवायचा निर्णय आता सरकारवर अवलंबून

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2020 10:47 PM

Open in App

नवी दिल्ल्ली : आयपीएल आता नेमके कुठे होणार, ही प्रतिक्षा आता संपलेली आहे. कारण आयपीएल युएईमध्ये होणार असल्याचे वक्तव्य आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी मंगळवारी केले.

पटेल यांनी स्टार स्पोर्टस्ला दिलेल्या माहितीनुसार स्पर्धा युएईमध्ये होणार असल्याचे स्पष्ट केले पण आयपीएलच्या तारखा अजूनही निश्चित करण्यात आलेल्या नाहीत, असेही त्यांनी सांगितले. येत्या ८-१० दिवसांत आयपीएलच्या तारखा जाहीर केल्या जातील, असे समजते आहे.आयपीएल खेळवण्याचा बीसीसीआयचा मार्ग मोकळा झाला असला तरी त्यांना काही परवानग्या घ्यावी लागणार आहेत.

आयपीएल खेळवायचा निर्णय आता भारत सरकारवर अवलंबून असेल, असे म्हटले जात आहे. आयपीएल खेळवण्याची विनंती बीसीसीआय भारत सरकारला करणार आहे. सरकारने विनंती मान्य केली तरच आयपीएल खेळवता येऊ शकते. मात्र तोपर्यंत देशातली परिस्थिती सुधारलेली नसेल तर यंदाची स्पर्धा ही यूएईमध्ये भरवण्यात येईल. भारत सरकारने आयपीएलला मान्यता दिल्यावर वेळापत्रक तयार केले जाणार आहे.

यापूवीर्ही युएईमध्ये आयपीएल आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे युएईला आयपीएलच्या आयोजनाचा चांगला अनुभव आहे. त्यामुळेच श्रीलंकेचा पर्याय खुला असताना बीसीसीआयने युएईला पसंती दिल्याचे समजत आहे. बीसीसीआयलाही काही मर्यादा आहेत आणि त्यामध्येच राहून त्यांना आपले काम करावे लागणार आहे.

आयपीएलसाठी लागणाऱ्या दोन महिन्यांचा मोठा प्रश्न सुटलेला आहे. मात्र अजूनही बरेच प्रश्न बीसीसीआयला सोडवायचे आहेत. त्यासाठी काहैी दिवसात बीसीसीआय एक महत्वाची बैठक बोलावणार आहे. या बैठकीमध्ये आयपीएल कशी खेळवता येईल, याबाबत सखोल चर्चा करण्यात येणार आहे. ‘खेळाडूंना किमान ३ ते ४ आठवडे सरावाची गरज आहे. बीसीसीआयने आयपीएलबद्दल अधिकृत घोषणा केली की लगेचच आम्ही सर्व तयारीला लागणार आहोत. यूएईमध्ये आयपीएल खेळण्यासाठी आम्ही तयार आहोत,’ अशी प्रतिक्रिया एका संघमालकाने बोलताना दिली. (वृत्तसंस्था)

च्आयपीएलनंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे. या दौºयाआधी कसोटीपटूंच्या सरावाचा मुद्दा आहे. चेतेश्वर पुजारा आणि हनुमा विहारी हे कसोटी खेळाडू आयपीएलचा भाग नाहीत. हे खेळाडू आयपीएलदरम्यान अहमदाबाद येथे जैव सुरक्षा व्यवस्थेत सराव करू शकतील.

च्कोरोना काळात ‘वर्क फ्रॉम होम’ ही संकल्पना यशस्वी ठरल्याने आयपीएल सामन्याचे समालोचन घरूनच होईल. हे काम सुरक्षित आणि कमी खर्चाचे आहे. शिवाय ७१ वर्षांचे सुनील गावसकर यांच्यासारख्या समालोचकांना सोयीचे होऊ शकेल.

किंग्स इलेव्हन पंजाबचे सहमालक नेस वाडिया यांच्यानुसार प्रेक्षकांना लाईव्ह क्रिकेट हवे आहे. अशावेळी आयपीएलदरम्यान टीव्ही प्रेक्षकांच्या संख्येत विक्रमी भर पडेल. अशा स्थितीत प्रसारणकर्ते प्रायोजकांना किती आकर्षिक करू शकतील,हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

चर्चेत असलेले मुद्दे

एका दिवसात किमान दोन सामन्यांचे आयोजनबीसीसीआयने आयपीएल संघांसाठी दिशानिर्देश निश्चित करणेयंदा प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश नसल्याने फ्रॅन्चायसींचे नुकसान होईल. अशावेळी बीसीसीआय फ्रॅन्चायसींना भरपाई देईल?

टॅग्स :आयपीएलबीसीसीआयकोरोना वायरस बातम्या