Join us

आयपीएल मीडिया हक्क: स्टार इंडियाने मारली बाजी, ५ वर्षांसाठी मोजणार १६ हजार कोटी रुपये

क्रिकेटविश्वातील सर्वात लोकप्रिय लीग असलेल्या इंडियन प्रीमीयर लीगच्या (आयपीएल) २०१८ ते २०२२ अशी पाच वर्षांचे मीडिया हक्क स्टार इंडियाने मिळवले आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 02:14 IST

Open in App

मुंबई : क्रिकेटविश्वातील सर्वात लोकप्रिय लीग असलेल्या इंडियन प्रीमीयर लीगच्या (आयपीएल) २०१८ ते २०२२ अशी पाच वर्षांचे मीडिया हक्क स्टार इंडियाने मिळवले आहे. सोमवारी मुंबईत झालेल्या या लिलावामध्ये स्टार इंडियाने तब्बल १६ हजार २३४.५० करोड रुपयांची सर्वाधिक बोली लावून बाजी मारली.या लिलावात जगभरातील नामांकित २४ कंपन्यांनी सहभाग घेतला होता. मात्र, यापैकी फक्त १४ कंपन्या प्रत्यक्षरित्या आर्थिक बोलीसाठी पाहावयास मिळाल्या. यातील एक कंपनी पात्रता फेरीत बाद झाली. उर्वरीत १३ कंपन्यांनी आयपीएलचे हक्क मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. यामध्ये स्टार इंडिया आणि सोनी पिक्चर्स यांच्यात मोठी चुरस पाहायला मिळाली. मात्र, स्टार इंडियाने सर्वाधिक बोली लावून बाजी मारली.याआधी आयपीएलच्या गेल्या दहा सत्रांसाठी टेलिव्हिजन हक्क सोनी पिक्चर्स नेटवर्ककडे होते. सोनीने २००८ साली ४,२०० कोटींची बोली लावून टेलिव्हिजन हक्क मिळवले होते. त्यानंतर २०१५ साली नोवी डिजिटलने ३०२.२ कोटी रुपये मोजून तीन वर्षांसाठी डिजिटल हक्क मिळविले होते.आयपीएलच्या मीडिया हक्कांची टेलिव्हिजन आणि डिजिटल अशा दोन माध्यमांमध्ये विभागणी करण्यात आली होती. यावेळी या लिलावात सोनी, बी स्पोर्ट्स, सुपरस्पोर्ट, फॉलोआॅन, यप टीव्ही, टाईम्स इंटरनेट, फेसबुक, एअरटेल, बीएम टेक, इको नेट, परफॉर्म ग्रुप, रिलायन्स जिओ अशा मोठ्या कंपन्यानी सहभाग घेतला होता.

टॅग्स :आयपीएलआयपीएल लिलाव