RCB vs PBKS: ...अन् आम्ही सामना गमावला; विराटचं कौतुक करत धवननं सांगितलं पराभवाचं कारण

IPL 2024 RCB vs PBKS Live Score Card: आरसीबीने पंजाब किंग्जविरूद्ध ४ गडी राखून विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2024 11:48 PM2024-03-25T23:48:37+5:302024-03-25T23:48:46+5:30

whatsapp join usJoin us
Ipl Match 2024 live score RCB vs PBKS Punjab Kings captain Shikhar Dhawan praises Virat Kohli and explains the reason behind the defeat | RCB vs PBKS: ...अन् आम्ही सामना गमावला; विराटचं कौतुक करत धवननं सांगितलं पराभवाचं कारण

RCB vs PBKS: ...अन् आम्ही सामना गमावला; विराटचं कौतुक करत धवननं सांगितलं पराभवाचं कारण

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024 RCB vs PBKS Live Updates In Marathi: विराट कोहलीची 'विराट' खेळी आणि दिनेश कार्तिकच्या मॅचविनिंग खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने विजयाचे खाते उघडले. पंजाब किंग्जचा ४ गडी राखून पराभव करून आरसीबीने दोन गुण मिळवले. आयपीएलच्या सतराव्या हंगामातील सहावा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज (PBKS vs RCB Live) यांच्यात खेळवला गेला. आरसीबीला आपल्या सलामीच्या सामन्यात चेन्नईकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. पण, पंजाब किंग्जला नमवून आरसीबीने विजयाचे खाते उघडले. पंजाबने दिलेल्या १७७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना यजमानांकडून विराट कोहलीने अप्रतिम खेळी केली.

आरसीबीने १९.२ षटकांत ६ बाद १७८ धावा करून विजय साकारला. (IPL 2024 News) अखेरच्या ७ चेंडूंत आरसीबीला ११ धावांची गरज होती. मग कार्तिकने एक धाव काढून स्ट्राईक आपल्याकडे ठेवली. अखेरचे षटक अर्शदीप सिंग घेऊन आला आणि त्याच्या पहिल्याच चेंडूवर दिनेश कार्तिकने अप्रतिम षटकार ठोकला. पुढचा चेंडू वाइड गेल्याने ५ चेंडूंत ३ धावा हव्या होत्या. त्याच्या पुढच्याच चेंडूवर कार्तिकने चौकार ठोकून संघाला विजय मिळवून दिला. दिनेश कार्तिकने २ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने १० चेंडूत नाबाद २८ धावांची मॅचविनिंग खेळी केली. 

पंजाब किंग्जचा पराभव 

सामना गमावल्यानंतर पंजाबचा कर्णधार शिखर धवनने सांगितले की, विराट कोहलीचा एक झेल सुटला त्याची आम्हाला किंमत मोजावी लागली. विराटने अप्रतिम खेळी केली पण त्याला बाद करण्याची संधी आम्हाला मिळाली होती, परंतु आम्हाला त्याचा फायदा घेता आला नाही. सन्मानजनक धावसंख्या उभारली पण मला वाटते की, आणखी २०-३० धावा करता आल्या असत्या. मी डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण मलाही आणखी काही धावा करणे गरजेचे होते, जे मी करू शकलो नाही. 

आरसीबीकडून विराट कोहलीने सर्वाधिक (७७) धावा केल्या, तर फाफ डुप्लेसिस (३), कॅमरून ग्रीन (३), रजत पाटीदार (१८), ग्लेन मॅक्सवेल (३), अनुज रावत (११), दिनेश कार्तिक (नाबाद २८ धावा) आणि महिपाल लोमरोरने नाबाद (१७) धावा केल्या. पंजाबकडून कगिसो रबाडा आणि हरप्रीत बरार यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला, तर सॅम करन आणि हर्षल पटेल यांना १-१ बळी घेण्यात यश आले. 

तत्पुर्वी, आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पंजाबला जॉनी बेअरस्टोच्या रूपात सुरुवातीलाच मोठा झटका बसला. त्यानंतर कर्णधार शिखर धवनने मोर्चा सांभाळला. त्याने सावध खेळी करत डाव पुढे नेला, ज्याला सिमरन सिंगने साथ दिली. पंजाबकडून शिखर धवनने सर्वाधिक (४५) धावा केल्या, तर जॉनी बेअरस्टो (८), सिमरन सिंग (२५), लियाम लिव्हिंगस्टोन (१७), सॅम करन (२३), जितेश शर्माने (२७) धावा केल्या. अखेरीस शशांक सिंगने २० चेंडूत २७ धावांची नाबाद खेळी केली. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने निर्धारित २० षटकांत ६ बाद १७६ धावा केल्या होत्या.

Web Title: Ipl Match 2024 live score RCB vs PBKS Punjab Kings captain Shikhar Dhawan praises Virat Kohli and explains the reason behind the defeat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.