Join us  

IPL 2024 DC vs PBKS: रिषभ पंतमध्ये दिसली धोनीची झलक! फलंदाजही झाला अवाक्

IPL 2024 PBKS vs DC Live Score Card: पंजाब किंग्जने सांघिक खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2024 8:57 PM

Open in App

IPL 2024 PBKS vs DC Live Updats In Marathi | मोहाली: रिषभ पंतने मोठ्या कालावधीनंतर पुनरागमन केले पण त्याच्या संघाला पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. दिल्ली कॅपिटल्सला नमवून शिखर धवनच्या नेतृत्वातील पंजाब किंग्जने पहिल्या सामन्यात शानदार विजय मिळवला. (PBKS vs DC) प्रथम फलंदाजी करताना दिल्लीला सन्मानजनक धावसंख्या उभारण्यात यश आले. मात्र, १७५ धावांचा बचाव करताना रिषभ पंतच्या (Rishab Pant) नेतृत्वातील संघाला अपयश आले.

इशांत शर्माने एकाच षटकात शिखर धवन आणि जॉनी बेअरस्टो यांना बाद करून रंगत आणली. पण, सहाव्या षटकादरम्यान क्षेत्ररक्षण करताना त्याला दुखापत झाली अन् दिल्लीला मोठा झटका बसला. (IPL 2024 Live) सॅम करनने ४७ चेंडूत ६३ धावा करून सामना आपल्या बाजूने फिरवला. (Sam Curren)

दरम्यान, पंतने महेंद्रसिंग धोनीच्या शैलीत कामगिरी केली. स्टम्पच्या मागून सामना फिरवण्याची क्षमता बाळगणारा धोनी अनेकांसाठी आदर्श आहे. पंजाब किंग्जविरूद्धच्या सामन्यात रिषभ पंतने (Rishabh Pant Video) जितेश शर्माला शानदार पद्धतीने स्टम्प बाद केले. पंजाबच्या डावाच्या १२ व्या षटकात कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर पंतने ही किमया साधली. 

दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना पंजाबला विजयासाठी १७५ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबने १९.२ षटकात ६ बाद १७७ धावा करून विजयाचे खाते उघडले. पंजाबकडून सॅम करनने सर्वाधिक (६३) धावा केल्या, तर लियाम लिव्हिंगस्टोनने नाबाद (३८) धावा केल्या. दिल्लीकडून कुलदीप यादव आणि खलील अहमद यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले, तर इशांत शर्माला (१) बळी घेण्यात यश आले. 

टॅग्स :रिषभ पंतमहेंद्रसिंग धोनीआयपीएल २०२४पंजाब किंग्सदिल्ली कॅपिटल्स