Join us  

IPL 2024 LSG vs PBKS: WHAT A BALL! सर्वात जलद गतीने चेंडू टाकणारा २१ वर्षीय मयंक यादव

IPL 2024 LSG vs PBKS Live Score Card: लखनौ सुपर जायंट्सच्या मयंक यादवने सर्वात जलद गतीने चेंडू टाकण्याची किमया साधली.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2024 10:45 PM

Open in App

IPL 2024 LSG vs PBKS Live Updats In Marathi । लखनौ: २०० धावांच्या आव्हानाचा बचाव करताना लखनौच्या गोलंदाजांना सुरुवातीला घाम फुटला. शिखर धवन आणि जॉनी बेअरस्टो या जोडीने अप्रतिम खेळी करून यजमानांची डोकेदुखी वाढवली. पण, लखनौचा वेगवान गोलंदाज मयंक यादवने त्याच्या गतीने बेअरस्टोला चीतपट केले. (Mayank Yadav Bowling) त्याने १५६ प्रति ताशी वेगाने गोलंदाजी केली. त्याने बेअरस्टोसह 'इम्पॅक्ट' प्लेअर सिमरन सिंगला बाहेरचा रस्ता दाखवला. त्याने संपूर्ण षटकात १५६, १५०, १४२, १४४, १५३ आणि १४९ च्या प्रति ताशी वेगाने गोलंदाजी केली. (IPL 2024 News) 

खरं तर २१ वर्षीय मयंक यादवने यंदाच्या आयपीएल हंगामातील सर्वात जलद चेंडू (१५६ प्रति ताशी वेग) चेंडू टाकला. तो त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील पहिला सामना खेळत आहे. मयंक यादवने ४ षटकांत २७ धावा देत ३ बळी घेतले. घातक वाटणाऱ्या जॉनी बेअरस्टो, सिमरन सिंग आणि जितेश शर्माला त्याने बाहेरचा रस्ता दाखवला. 

IPL 2024 मध्ये जलद गतीने चेंडू टाकणारे गोलंदाज

  1. मयंक यादव - १५६ प्रति ताशी वेग
  2. नंद्रे बर्गर - १५३ प्रति ताशी वेग
  3. गेराल्ड कोएत्झे - १५२.३ प्रति ताशी वेग 
  4. अल्झारी जोसेफ - १५१.२ प्रति ताशी वेग
  5. मथीक्क्षा पथिराना - १५०.९ प्रति ताशी वेग

मयंकच्या २४ चेंडूंचा वेग खालीलप्रमाणे -१४७, १४६, १५०, १४१, १४७, १४९, १५६, १५०, १४२, १४४, १५३, १४९, १५२, १४९, १४७, १४५, १४०, १४२, १५३, १५४, १४९, १४२, १५२, आणि १४८ प्रति ताशी वेगाने मयंकने त्याच्या स्पेलमधील अखेरचा चेंडू टाकला. 

दरम्यान, आयपीएलच्या सतराव्या हंगामातील अकराव्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज भिडले. पदार्पणाच्या सामन्यातच २१ वर्षीय मयंक यादवने सर्वांना प्रभावित केले. इतर सर्व गोलंदाज अपयशी ठरत असताना मयंकने ४ षटकांत ३ बळी घेतले. 

पंजाब किंग्जचा संघ -

शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेयरस्टो, सॅम करन, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), हरप्रीत बरार, हर्षल पटेल, कगिसो रबाडा, राहुल चाहर, अर्शदीप सिंग आणि शशांक सिंग. 

लखनौचा संघ -निकोलस पूरन (कर्णधार), क्विंटन डीकॉक (यष्टीरक्षक), देवदत्त पडिक्कल, मार्कस स्टॉयनिस, आयुष बदोनी, कृणाल पांड्या, नवीन-उल-हक, रवी बिश्नोई, यश ठाकूर, मोहसिन खान, मणिमरम सिद्धार्थ. 

टॅग्स :लखनौ सुपर जायंट्सपंजाब किंग्सशिखर धवनआयपीएल २०२४