IPL 2024 LSG vs PBKS: लखनौने टॉस जिंकला, कर्णधार बदलला; राहुलवर 'इम्पॅक्ट'ची जबाबदारी

IPL 2024 LSG vs PBKS Live Score Card: आज लखनौ आणि पंजाब यांच्यात सामना होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2024 07:04 PM2024-03-30T19:04:21+5:302024-03-30T19:04:28+5:30

whatsapp join usJoin us
 Ipl Match 2024 live score LSG vs PBKS Lucknow Super Giants have won the toss and elected to bat first  | IPL 2024 LSG vs PBKS: लखनौने टॉस जिंकला, कर्णधार बदलला; राहुलवर 'इम्पॅक्ट'ची जबाबदारी

IPL 2024 LSG vs PBKS: लखनौने टॉस जिंकला, कर्णधार बदलला; राहुलवर 'इम्पॅक्ट'ची जबाबदारी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024 LSG vs PBKS Live Updats In Marathi । लखनौ: आयपीएलच्या सतराव्या हंगामातील अकरावा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात होत आहे. पंजाब यंदाच्या हंगामातील तिसरा तर लखनौ दुसरा सामना खेळत आहे. लोकेश राहुलचा संघ आपल्या पहिल्या विजयाच्या शोधात आहे. (LSG vs PBKS) शिखर धवनच्या नेतृत्वातील पंजाबने दिल्ली कॅपिटल्सला नमवून विजयी सलामी दिली. पण आरसीबीकडून पराभव पत्करावा लागला. लखनौमधील इकाना स्टेडियमवर हा सामना खेळवला जात आहे. (IPL 2024 News) 

आजच्या सामन्यासाठी लखनौचा कर्णधार निकोलस पूरनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. खरं तर नाणेफेकीवेळी लखनौचा नियमित कर्णधार लोकेश राहुल दिसला नाही. त्याच्या जागी निकोलस पूरन आला. त्यामुळे राहुल आजचा सामना खेळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण, राहुल इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळणार आहे. लखनौच्या कर्णधाराच्या निर्णयाचे स्वागत करताना पंजाबचा कर्णधार शिखर धवनने सांगितले की, आम्हाला देखील प्रथम गोलंदाजी करायची होती. 

पंजाब किंग्जचा संघ -

शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेयरस्टो, सॅम करन, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), हरप्रीत बरार, हर्षल पटेल, कगिसो रबाडा, राहुल चाहर, अर्शदीप सिंग आणि शशांक सिंग. 

लखनौचा संघ -
निकोलस पूरन (कर्णधार), क्विंटन डीकॉक (यष्टीरक्षक), देवदत्त पडिक्कल, मार्कस स्टॉयनिस, आयुष बदोनी, कृणाल पांड्या, नवीन-उल-हक, रवी बिश्नोई, यश ठाकूर, मोहसिन खान, मणिमरम सिद्धार्थ. 

Web Title:  Ipl Match 2024 live score LSG vs PBKS Lucknow Super Giants have won the toss and elected to bat first 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.