Join us  

IPL 2024 LSG vs PBKS: धवनची झुंज अयशस्वी! २१ वर्षीय मयंक पदार्पण'वीर', लखनौनं उघडलं खातं

IPL 2024 LSG vs PBKS Live Score Card: लखनौ सुपर जायंट्सने पाहुण्या पंजाब किंग्जचा २१ धावांनी पराभव केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2024 11:13 PM

Open in App

IPL 2024 LSG vs PBKS Live Updats In Marathi । लखनौ: लखनौ सुपर जायंट्सने आपल्या दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून विजयाचे खाते उघडले. लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात इकाना स्टेडियमवर सामना पार पडला. घरच्या मैदानावर विजय मिळवून लखनौच्या नवाबांनी २ गुण मिळवले. पाहुण्या संघाकडून कर्णधार शिखर धवनने एकतर्फी झुंज दिली. पण, २१ वर्षीय मयंक यादव (Mayank Yadav) पदार्पणवीर ठरला. त्याने त्याच्या IPL कारकिर्दीतील पहिल्याच सामन्यात कमाल करत सर्वात जलद गतीने चेंडू टाकण्याची किमया साधली. त्याने ४ षटकांत २७ धावा देत ३ बळी घेऊन सर्वांना प्रभावित केले. पंजाबचा संघ २०० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना निर्धारित २० षटकांत ५ बाद १७८ धावा करू शकला आणि २१ धावांनी सामना गमावला. (IPL 2024 News) 

पंजाबकडून शिखर धवनने सर्वाधिक धावा केल्या, त्याने ३ षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने ५० चेंडूत ७० धावा कुटल्या. तर जॉनी बेअरस्टो (४२), सिमरन सिंग (१९), जितेश शर्मा (६), सॅम करन (०) आणि लियाम लिव्हिंगस्टोनने नाबाद (२८) धावा केल्या. लखनौकडून मयंक यादवने सर्वाधिक (३) बळी घेतले, तर मोहसिन खानला (२) बळी घेण्यात यश आले. 

तत्पुर्वी, लखनौकडून डीकॉकने २ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने ३८ चेंडूत सर्वाधिक ५४ धावा केल्या, तर राहुल (१५), देवदत्त पडिक्कल (९), मार्कस स्टॉयनिस (१९), निकोलस पूरन (४२), आयुष बदोनी (८), रवी बिश्नोई (०), मोहसिन खान (२) आणि कृणाल पांड्याने नाबाद (४३) धावा केल्या. लखनौने निर्धारित २० षटकांत ८ बाद १९९ धावा केल्या होत्या. पंजाब किंग्जकडून सॅम करनने सर्वाधिक (३) बळी घेतले, तर अर्शदीप सिंग (२), कगिसो रबाडा आणि राहुल चहर यांना प्रत्येकी १-१ बळी घेण्यात यश आले. 

पंजाब किंग्जचा संघ -शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेयरस्टो, सॅम करन, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), हरप्रीत बरार, हर्षल पटेल, कगिसो रबाडा, राहुल चाहर, अर्शदीप सिंग आणि शशांक सिंग. 

लखनौचा संघ -निकोलस पूरन (कर्णधार), क्विंटन डीकॉक (यष्टीरक्षक), देवदत्त पडिक्कल, मार्कस स्टॉयनिस, आयुष बदोनी, कृणाल पांड्या, नवीन-उल-हक, रवी बिश्नोई, यश ठाकूर, मोहसिन खान, मणिमरम सिद्धार्थ. 

टॅग्स :शिखर धवनपंजाब किंग्सलखनौ सुपर जायंट्सआयपीएल २०२४