IPL 2024 CSK vs RCB: ५० चेंडूत ९५ धावा! कार्तिक-रावतने डाव सावरला, RCBने सन्मानजनक धावसंख्या उभारली

IPL 2024 CSK vs RCB Live Score Card: मुस्तफिजुर रहमानने अप्रतिम गोलंदाजी केल्यानंतर अखेरच्या काही षटकांमध्ये आरसीबीने चांगली कामगिरी करून सन्मानजनक धावसंख्या उभारली.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 09:52 PM2024-03-22T21:52:11+5:302024-03-22T21:52:52+5:30

whatsapp join usJoin us
Ipl Match 2024 live score csk vs rcb Royal Challengers Bangalore set Chennai Super Kings a target of 174 runs to win, Mustafizur Rahman took 4 wickets, Dinesh Karthik and Anuj Rawat did well | IPL 2024 CSK vs RCB: ५० चेंडूत ९५ धावा! कार्तिक-रावतने डाव सावरला, RCBने सन्मानजनक धावसंख्या उभारली

IPL 2024 CSK vs RCB: ५० चेंडूत ९५ धावा! कार्तिक-रावतने डाव सावरला, RCBने सन्मानजनक धावसंख्या उभारली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

CSK vs RCB Match Live Updates | चेन्नई: मुस्तफिजुर रहमानची घातक गोलंदाजी, दीपक चाहरने कॅमरून ग्रीनचा काढलेला त्रिफळा आणि अजिंक्य रहाणेचा अप्रतिम झेल... (CSK vs RCB Live Match) सलामीच्या सामन्यात यजमान चेन्नई सुपर किंग्जने सुरुवात चांगली झाली नसताना देखील दबदबा निर्माण केला. पण, अखेरच्या काही षटकांमध्ये दिनेश कार्तिक आणि अनुज रावत यांच्या खेळीने आरसीबीने सन्मानजनक धावसंख्या उभारण्यात यश मिळवले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना आरसीबीकडून कर्णधार फाफ डुप्लेसिसने स्फोटक खेळी केली. (IPL 2024 Live) 

आरसीबीची गाडी सुस्साट धावत असताना मुस्तफिजुर रहमानने या गाडीला ब्रेक लावला. डावाच्या ४१ धावांवर आरसीबीने कर्णधाराच्या रूपात आपला पहिला गडी गमावला. त्यानंतर त्याच षटकात रजत पाटीदार एकही धाव न करता तंबूत परतला. त्यानंतर दीपक चाहरने ग्लेन मॅक्सवेल आणि मुस्तफिजुरने कॅमरून ग्रीनला आपल्या जाळ्यात फसवले. विराट कोहलीने संथ खेळी करून डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या वाटेत अजिंक्य रहाणे आला. मुस्तफिजुरच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात असलेल्या विराटचा रहाणेने अप्रितम झेल घेतला. सीमारेषेच्या दिशेने चेंडू कूच करत असताना त्याने झेल टिपला अन् त्याच्या मदतीला रचीन रवींद्र धावला. दोघांनी मिळून झेल पूर्ण केला. विराट कोहली २० चेंडूत २१ धावा करून बाद झाला. आरसीबीने निर्धारित २० षटकांत ६ बाद १७३ धावा केल्या. 

दरम्यान, संघ अडचणीत असताना दिनेश कार्तिकने आपल्या अनुभवाचा फायदा घेत संयमी खेळी केली, त्याला अनुज रावतने मोलाची साथ दिली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून फाफ डुप्लेसिस (३५), रजत पाटीदार (०), ग्लेन मॅक्सवेल (०), कॅमरून ग्रीन (१८) आणि विराट कोहलीने (२१) धावा केल्या. याशिवाय अनुज रावतने (४८) आणि दिनेश कार्तिकने नाबाद (३८) धावा कुटल्या. ११.४ षटकांत आरसीबीची धावसंख्या ५ बाद केवळ ७८ धावा अशी होती. संघ अडचणीत असताना दिनेश कार्तिक आणि अनुज रावत यांनी डाव पुढे नेला. या जोडीने ५० चेंडूत ९५ धावा केल्या. चेन्नईकडून मुस्तफिजुरने सर्वाधिक ४ बळी घेतले. त्याने ४ षटकांत ३० धावा देत ही किमया साधली. आरसीबीने चेन्नईला विजयासाठी १७४ धावांंचे आव्हान दिले आहे. 

आजच्या सामन्यासाठी CSK चा संघ -
ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डेरिल मिचेल, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), दीपक चाहर, महेश तीक्ष्णा, मुस्तफिजुर रहमान आणि तुषार देशपांडे.

आजच्या सामन्यासाठी RCB चा संघ - 
फाफ डु प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमरून ग्रीन, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), अनुज रावत, कर्ण शर्मा, अल्झारी जोसेफ, मयंत डागर आणि मोहम्मद सिराज.

Web Title: Ipl Match 2024 live score csk vs rcb Royal Challengers Bangalore set Chennai Super Kings a target of 174 runs to win, Mustafizur Rahman took 4 wickets, Dinesh Karthik and Anuj Rawat did well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.