Join us  

R Ashwin vs Kumar Sangakara : कुमार संगकाराचे अश्विनवर गंभीर आरोप; मानहानिकारक पराभवानंतर राजस्थानच्या संघात फूट?

राजस्थान रॉयल्स संघाला आयपीएल २०२२ च्या फायनलमध्ये लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. पराभव झाल्यावर आता संघात आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 11:05 AM

Open in App

राजस्थान रॉयल्स संघाला आयपीएल २०२२ च्या फायनलमध्ये लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. पराभव झाल्यावर आता संघात आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली. राजस्थान संघात मोठी फूट पडू शकते, अशी शक्यता निर्माण झाली आहे. संघाचे संचालक आणि श्रीलंकेचे माजी कर्णधार कुमार संगकारा यांनी रविचंद्रन अश्विनवर जळजळीत आरोप करताच संघातील निराशा या मार्गाने बाहेर पडत असल्याचे दिसते.

सामना संपल्यावर संगकारा यांनी अश्विनबाबत म्हटले आहे की, ‘अश्विन हा एक अनुभवी खेळाडू आहे आणि आतापर्यंत त्याने बरेच विक्रम रचले आहेत. पण, एवढ्या प्रदीर्घ कारकिर्दीनंतर अश्विनच्या कामगिरीत अजूनही सुधारणेची गरज आहे. अश्विन हा एक ऑफस्पिनर आहे. त्यामुळे त्याने जास्त त्या पद्धतीचे चेंडू टाकायला हवे. पण, अश्विनकडून मात्र तशी गोष्ट आयपीएलमध्ये पाहायला मिळाली नाही. अश्विनने या आयपीएलमध्ये जास्त ऑफ स्पिन गोलंदाजी केलीच नाही, त्याने जास्तीत जास्त कॅरम बॉल टाकण्यावर भर दिला आणि त्याचाच फटका बसला. अश्विनने जर जास्त ऑफ स्पिन गोलंदाजी केली असती तर कदाचित परिणाम वेगळे असू शकले असते. त्यामुळे त्याला अजूनही सुधारणा करण्याची गरज आहे.’

अश्विन हा राजस्थान संघातील अनुभवी गोलंदाज होता. त्याच्याकडून संघाला मोठ्या अपेक्षा होत्या. पण, अश्विनला मात्र अंतिम फेरीत लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्याच्यावर पराभवाचे खापर फोडले जात आहे.

अश्विनने अंतिम फेरीत तीन षटके टाकली, या तीन षटकांमध्ये त्याने ३२ धावा दिल्या आणि एकही बळी त्याला मिळविता आला नाही; पण दुसरा फिरकीपटू युजवेंद्र चहलने दमदार गोलंदाजी केली. त्याचबरोबर चहलने या आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी मिळविले आणि पर्पल कॅपही पटकाविली. त्यामुळे चहल हा अश्विनपेक्षा सरस ठरला.

टॅग्स :आयपीएल २०२२राजस्थान रॉयल्सआर अश्विनकुमार संगकारा
Open in App