Join us  

IPL 2024 चा आनंद लुटण्यासाठी ५० शहरांमध्ये फॅन पार्क; जाणून घ्या तुमच्या शहरात कुठे असणार

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( BCC) नेहमीच हा खेळ जगभरातील आणि देशातील चाहत्यांच्या जवळ आणण्यासाठी प्रयत्नशील असतात.  

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 5:30 PM

Open in App

इंडियन प्रीमियर लीग २०२४ ( IPL 2024) अवघ्या दोन दिवसांवर आली आहे. २२ मार्चला गतविजेता चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( CSK vs RCB) यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ला सुरुवात होणार आहे. या आयपीएलचा आनंद अधिक द्विगणित करण्यासाठी BCCI ने मोठा निर्णय घेतला आहे. भारतातल्या ५० शहरांमध्ये फॅन पार्क उभारण्यात येणार आहे. 

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( BCC) नेहमीच हा खेळ जगभरातील आणि देशातील चाहत्यांच्या जवळ आणण्यासाठी प्रयत्नशील असतात.  हे लक्षात घेऊन २०१५ मध्ये फॅन पार्क संकल्पना त्यांनी प्रत्यक्षात आणली. IPL 2024 च्या पहिल्या दोन आठवड्याचे वेळापत्रक जाहीर केले गेले आहे. २२ मार्च ते ७ एप्रिल २०२४ या कालावधीत १५ फॅन पार्क उभारण्यात येणार आहेत. चेन्नई सुपर किंग्ज (CSK) व  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यातल्या सामन्यासाठी २२ मार्चला मदुराई येथे पहिला फॅन पार्क उभारण्यात येईल.

उत्तर प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, तामिळनाडू, उत्तराखंड, गुजरात, कर्नाटक, झारखंड, पंजाब आणि तेलंगणा या ११ राज्यांत IPL 2024 च्या पहिल्या दोन आठवड्यांमध्ये फॅन पार्कचे आयोजन करण्यात येईल.  

IPL 2024 वेळापत्रक

  • २२ मार्च - चेन्नई सुपर किंग्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, रात्री ८ वा.पासून, चेन्नई
  • २३ मार्च - पंजाब किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स, दुपारी ३.३० वा. पासून, मोहाली
  • २३ मार्च - कोलकाता नाइट रायडर्स वि. सनरायझर्स हैदराबाद, रात्री ८ वा. पासून, कोलकाता
  • २४ मार्च - राजस्थान रॉयल्स वि. लखनौ सुपर जायंट्स, दुपारी ३.३० वा.पासून, जयपूर
  • २४ मार्च - गुजरात टायटन्स वि. मुंबई इंडियन्स, रात्री ८ वा. पासून, अहमदाबाद
  • २५ मार्च - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. पंजाब किंग्स, रात्री ८ वा. पासून, बंगळुरू
  • २६ मार्च - चेन्नई सुपर किंग्स वि. गुजरात टायटन्स, रात्री ८ वा.पासून, चेन्नई
  • २७ मार्च - सनरायझर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स, रात्री ८ वा. पासून, हैदराबाद
  • २८ मार्च - राजस्थान रॉयल्स वि. दिल्ली कॅपिटल्स, रात्री ८ वा. पासून, जयपूर
  • २९ मार्च - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. कोलकाता नाइट रायडर्स, रात्री ८ वा. पासून, बंगळुरू
  • ३० मार्च - लखनौ सुपर जायंट्स वि. पंजाब किंग्स, रात्री ८ वा. पासून, लखनौ
  • ३१ मार्च - गुजरात टायटन्स वि. सनरायझर्स हैदराबाद, दुपारी ३.३० वा. पासून, अहमदाबाद
  • ३१ मार्च - दिल्ली कॅपिटल्स वि. चेन्नई सुपर किंग्स, रात्री ८ वा. पासून, विशाखापट्टणम
  • १ एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स, रात्री ८ वा. पासून, मुंबई
  • २ एप्रिल - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. लखौ सुपर जायंट्स, रात्री ८ वा. पासून, बंगळुरू
  • ३ एप्रिल - दिल्ली कॅपिटल्स वि. कोलकाता नाइट रायडर्स, रात्री ८ वा. पासून, विशाखापट्टणम
  • ४ एप्रिल - गुजरात टायटन्स वि. पंजाब किंग्स, रात्री ८ वा. पासून, अहमदाबाद
  • ५ एप्रिल - राजस्थान रॉयल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू,रात्री ८ वा. पासून, जयपूर
  • ७ एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स, दुपारी ३.३० वा.पासून, मुंबई
  • ७ एप्रिल - लखनौ सुपर जायंट्स वि. गुजरात टायटन्स, रात्री ८ वा. पासून, लखनौ
टॅग्स :आयपीएल २०२४ऑफ द फिल्ड