Join us  

मोठी बातमी : IPL 2022 Auction ची तारीख ठरली; अहमदाबाद-लखनौ फ्रँचायझींना दोन आठवड्यांचा कालावधी मिळाला; जाणून घ्या ८ फ्रँचायझींची रिटेन लिस्ट

IPL 2022 Auction : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2022) १५व्या पर्वात दहा संघ खेळणार असल्याने मेगा ऑक्शन होणार आहे. आयपीएल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2022 5:06 PM

Open in App

IPL 2022 Auction : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2022) १५व्या पर्वात दहा संघ खेळणार असल्याने मेगा ऑक्शन होणार आहे. आयपीएल चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी येत्या १२ व १३ फेब्रुवारीला बंगळुरू येथे ऑक्शन पार पडणार असल्याचे जाहीर केले. अहमदाबाद व लखनौ या दोन नव्या फ्रँचायझींना प्रत्येकी ३-३ खेळाडू करारबद्ध करण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. Vivo हे आयपीएलचे टायटल स्पॉन्सर्स नसतील आणि त्यांच्या जागी TATA हे नाव आता आयपीएलच्या पुढे दिसेल अशी माहितीही  त्यांनी दिली. लखनौ फ्रँचायझीच्या कर्णधारपदाच्या शर्यतीत लोकेश राहुल, तर अहमदाबादसाठी हार्दिक पांड्या हे नाव आघाडीवर आहे. पुढील आठवड्यात दोन्ही फ्रँचायझी अधिकृत घोषणा करतील, अशी अपेक्षा आहे.

८ फ्रँचायझींनी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी

  • पंजाब किंग्स - मयांक अग्रवाल ( 14 कोटी), अर्षदीप सिंग ( 4 कोटी) ; शिल्लक रक्कम - 72 कोटी
  • सनरायझर्स हैदराबाद - केन विलियम्सन ( 14 कोटी), अब्दुल समद ( 4 कोटी), उम्रान मलिक ( 4 कोटी); शिल्लक रक्कम - 68 कोटी
  • राजस्थान रॉयल्स - सजू सॅमसन ( 14 कोटी), जोस बटलर ( 10 कोटी), यशस्वी जैस्वाल ( 4 कोटी); शिल्लक रक्कम - 62 कोटी
  • रॉयल चॅलेंजर्स बंगलोर - विराट कोहली ( 15 कोटी), ग्लेन मॅक्सवेल ( 11 कोटी), मोहम्मद सिराज ( 7 कोटी); शिल्लक रक्कम - 57 कोटी
  • चेन्नई सुपर किंग्स - रवींद्र जडेजा ( 16 कोटी), महेंद्रसिंग धोनी ( 12 कोटी), ऋतुराज गायकवाड( 6 कोटी) , मोईन अली ( 8 कोटी); शिल्लक रक्कम - 48 कोटी
  • मुंबई इंडियन्स - रोहित शर्मा ( 16 कोटी), जसप्रीत बुमराह ( 14 कोटी), किरॉन पोलार्ड ( 6 कोटी), सूर्यकुमार यादव ( 8 कोटी); शिल्लक रक्कम - 48 कोटी
  • कोलकाता नाइट रायडर्स - आंद्रे रसेल ( 12 कोटी), वरुण चक्रवर्थी ( 8 कोटी), वेंकटेश अय्यर ( 8 कोटी) , सुनील नरीन ( 6 कोटी); शिल्लक रक्कम - 48 कोटी
  • दिल्ली कॅपिटल्स - रिषभ पंत ( 16 कोटी), अक्षर पटेल ( 12 कोटी), पृथ्वी शॉ ( 8 कोटी), अॅनरीच नॉर्ट्जे ( 6 कोटी); शिल्लक रक्कम - 47 कोटी
  •  

संबंधित बातम्या 

फ्रँचायझींनी रिलिज केलेल्या लोकेश राहुल, शिखर धवन, डेव्हिड वॉर्नर हे लिलावात भाव खाणार

रवींद्र जडेजा, रोहित शर्मा, रिषभ पंत ठरले महागडे खेळाडू; जाणून घ्या संपूर्ण रिटेन लिस्ट

टॅग्स :आयपीएल २०२१बीसीसीआय
Open in App