Join us

आयपीएल ‘पास’चा काळाबाजार थांबणार

आयपीएल सामन्यांचे विशेष पासची विक्री करणाऱ्या क्रिकेट क्लबवर कारवाई केली जाणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय नवर्निवाचित प्रशासक निवृत्त न्यायामूर्ती हेमंत गोखले व न्या़ व्ही़ एम़ कानडे यांनी गुरूवारी घेतला़

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 05:19 IST

Open in App

मुंबई : आयपीएल सामन्यांचे विशेष पासची विक्री करणाऱ्या क्रिकेट क्लबवर कारवाई केली जाणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय नवर्निवाचित प्रशासक निवृत्त न्यायामूर्ती हेमंत गोखले व न्या़ व्ही़ एम़ कानडे यांनी गुरूवारी घेतला़ हा निर्णय मुंबईत शनिवारी होणाºया आयपीएल सामन्यांपासून लागू होणार आहे़ त्यामुळे विशेष पासची होणारी अवैध विक्री थांबणार आहे़विशेष म्हणजे या पासचे वितरण करताना महिला क्रिकेट खेळाडूंना प्राधान्य द्यावे़ जेणेकरून त्यांना अधिक प्रोत्साहन मिळू शकेल, असेही प्रशासकांनी नमूद केले आहे़आयपीएल सामन्यांच्या विशेष पासचे वितरण करणाºया प्रशासकांनी मागदर्शकतत्त्वे आखून दिली़ गुरूवारी दुपारी १२ वाजता न्या़ गोखले व न्या़ कानडे यांनी हे काम सुरू केले़ रात्री साडेआठच्या सुमारास हे काम पूर्ण झाले़ नवीन मार्गदर्शकांनुसार, एमसीएशी संलग्न असलेल्या तिनशेहून अधिक क्लबला आता प्रत्येकी १० पासेस मिळणार असून हे पास वितरीत करताना आजी - माजी महिला क्रिकेटपटू, महापौर, विधान परिषद - विधानसभा अध्यक्ष अशा महत्त्वाच्या पदावरील व्यक्तींचा प्राधान्याने विचार व्हावा असे सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे पोलीस, आमदार यांना मिळणारा पास कोटाही मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आला आहे. प्रशासकांनी प्रत्येक क्लबला मिळालेले पास योग्य व्यक्तीला मिळल्याचे हमी पत्र द्यावे, असे बजावले असून यामध्ये कोणताही गैरव्यवहार आढळला, तर त्या क्लबविरुद्ध कठोर कारवाई होईल असेही सुनावले असल्याचे सूत्रांनी सांगितले़