आयपीएलच्या साखळी लढती अंतिम टप्प्यात आहेत. प्ले आॅफमधून केवळ एकच संघ आतापर्यंत बाद झाला. काल दिल्लीने चेन्नईला सहज नमविल्यानंतर मात्र समीकरणांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. हे आळशी आणि निराश लोकांचे काम आहे, असे मला वाटते. तुम्ही
अंधारात वास्तव्य करीत असाल तर तुम्हाला सर्वत्र अंधारच जाणवेल. आयपीएलचे सामने अटीतटीचे आणि उत्कंठापूर्ण होण्यामागे सुरुवातीला घेण्यात आलेला मोठा निर्णय आहे. कुठल्याही संघाकडे मोठी संपत्ती असेल पण खेळाडूंच्या लिलावात त्यांना समान पैसा वापरता येईल, हा तो निर्णय होता. दुसऱ्या शब्दांत एखाद्या बोर्डिंग स्कूलमध्ये मालक आणि मजुराच्या मुलाला सारखा ‘पॉकेटमनी’ दिला जावा. याच कारणामुळे संघ संतुलित दिसतात. अनपेक्षित निकालदेखील यामुळेच पाहायला मिळतात.
आयपीएल खेळाडूंना थकवा आणतो. सलग सामने आणि प्रवास यामुळे थकवा जाणवतो, मी खेळत नाही आणि सरावही करीत नाही, तरीही थकवा येतो. ही किती थकविणारी स्पर्धा आहे, याची कल्पना यामुळे येऊ शकते. थकव्यामुळे अनेक सामन्यांत निकाल वेगळेच लागले.
सामने आणखी रोमहर्षक बनविण्यासाठी स्पर्धेदरम्यान ट्रान्सफरचा नियम थोडा अधिक धाडसी असायला हवा. सर्वच संघांची बांधणी योग्यरीत्या करण्यात आली हे खरे असून, खेळाडू लोनवर घेत प्रतिस्पर्धी संघाला आणखी भक्कम करणे कुणालाही परवडणारे नाही. पण काही खेळाडू असेही आहेत, की ज्यांना अद्याप प्रतिभा दाखविण्याची संधीही मिळालेली नाही. उलट सर्वांना संधी मिळावी, हाच आयपीएलचा हेतू आहे. यंदा केकेआरला एका चांगल्या भारतीय गोलंदाजाची गरज होती. खलील अहमद आणि नवदीप सैनी हे चांगले गोलंदाज संघात असूनही त्यांना संधी मिळाली नाही. आयपीएलच्या दोन पैलूंवर लक्ष देण्याची गरज आहे. एकतर सामने अधिक वेळ चाललात आणि दुसरे गोलंदाजीसाठी लागणारा वेळ. यामागे ‘रिव्ह्यू सिस्टिम’ हे कारण असू शकते. पण पंचांनी खेळाडूंना हे सांगण्याची वेळ आली आहे. मी भारतीय पंचांचा पाठीराखा आहे. सामन्यात निर्णायकाची भूमिका चांगली व्हावी, हे सांगताना मला बरे वाटत नाही, पण बोलावे लागते. पण हा अनुभव पुढे चांगला असेल. पुढील सत्रात काही पंच आणखी तरबेज होऊन काम करतील, अशी अपेक्षा आहे.
(टीसीएम)