Join us  

IPL : चेन्नई सुपरकिंग्जवरील बंदी अयोग्य होती; श्रीनिवासन यांनी डागली बीसीसीआयवर तोफ

कडक शब्दांत चेन्नई सुपरकिंग्ज संघाचे मालक एन. श्रीनिवासन यांनी टीका केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2019 5:09 PM

Open in App

मुंबई, आयपीएल 2019 : आयपीएलमधील स्पॉट-फिक्संगप्रकरणी चेन्नई सुपरकिंग्जवर घालण्यात आलेली बंदी ही अयोग्य होती, अशा कडक शब्दांत चेन्नई सुपरकिंग्ज संघाचे मालक एन. श्रीनिवासन यांनी टीका केली आहे.

चेन्नई सुपरकिंग्ज संघाबरोबर असलेल्या काही व्यक्तींनी फिक्संग केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. त्याचबरोबर श्रीनिवासन यांचे जावई गुरुनाथ मयप्पनचे सट्टेबाजांशी असलेले संबंधही उघड झाले होते. त्यामुळे चेन्नई सुपरकिंग्ज संघावर दोन वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला होता. बंदी उठल्यावर चेन्नई सुपरकिंग्जचा संघ गेल्या हंगामात आयपीएलमध्ये खेळला होता.

श्रीनिवासन यांनी सांगितले की, " बीसीसीआयमध्ये मीदेखील काम केले आहे. मी बीसीसीआयचा अध्यक्षही होतो. पण काम करून आम्ही कधीही त्याची जाहिरातबाजी केली नाही किंवा कोणतेही हितसंबंध जपले नाहीत. सध्याच्या घडीला बीसीसीआयमध्ये ज्या व्यक्ती कार्यरत आहेत, त्या स्वत:चा फायदा बघत आहे. "

चेन्नई सुपरकिंग्ज संघावरील बंदीबद्दल श्रीनिवासन म्हणाले की, " चेन्नई सुपरकिंग्ज संघावरील बंदी ही योग्य नव्हती. कारण संघातील खेळाडूंनी कोणताही चूक केली नव्हती. चेन्नई सुपरकिंग्ज संघाला जी शिक्षा झाली त्यासाठी ते नक्कीच लायक नव्हते. "

टॅग्स :चेन्नई सुपर किंग्सआयपीएल 2019आयपीएल