IPLच्या लिलावात लागली मोठी बोली, पण मैदानात उतरल्यावर ठरला 'फ्लॉप शो', पाहा यादी

IPL auction worst buys Past decade: प्रत्येक वर्षी IPLमध्ये एखादा खेळाडू असा असतोच, ज्याच्यावर मोठी बोली लागते पण त्याला लौकिकाला साजेशी कामगिरी करता येत नाही

By विराज भागवत | Updated: April 2, 2025 18:19 IST2025-04-02T18:18:33+5:302025-04-02T18:19:13+5:30

whatsapp join usJoin us
IPL auction worst buys of past decade yuvraj pawan negi jamieson mills maxwel | IPLच्या लिलावात लागली मोठी बोली, पण मैदानात उतरल्यावर ठरला 'फ्लॉप शो', पाहा यादी

IPLच्या लिलावात लागली मोठी बोली, पण मैदानात उतरल्यावर ठरला 'फ्लॉप शो', पाहा यादी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL auction worst buys Past decade: भारतात सध्या IPLची धूम सुरु आहे. IPL 2025 च्या हंगामातील एक आठवड्यापेक्षा जास्तचा खेळ झालेला आहे. सुरुवातीच्या १० दिवसांत काही खेळाडू अनपेक्षितपणे सुपरहिट ठरले आहेत. तर काही खेळाडूंना मोठी बोली मिळूनही त्यांना सूर गवसलेला नाही. रिषभ पंतला सर्वाधिक २७ कोटींची बोली लागली असूनही त्याला आपला प्रभाव अद्याप पाडता आलेला नाही. त्यामुळे सध्या मोठी बोली लागलेल्या फ्लॉफ खेळाडूंची चर्चा सुरु आहे. त्या अनुषंगाने पाहूया गेल्या दशकातील काही खेळाडूंची यादी...

दिनेश कार्तिक (IPL 2014) -दिनेश कार्तिकला दिल्ली संघाने १२.५० कोटींना खरेदी केले होते. पण त्याला संपूर्ण हंगामातील १४ सामन्यांत मिळून ३२५ धावाच करता आल्या.

युवराज सिंग (IPL 2015) -युवराज सिंग याला दिल्लीच्या संघाने १६ कोटींची बोली लावून विकत घेतले होते. पण त्याला संपूर्ण हंगामात १४ सामन्यांमध्ये केवळ २४८ धावाच करता आल्या.

पवन नेगी (IPL 2016) - स्पिनर पवन नेगी याला दिल्लीने या हंगामात ८.५० कोटींना विकत घेतले होते. पण त्याला ८ सामन्यात केवळ ५७ धावा आणि १ बळी घेतला आला.

टायमल मिल्स (IPL 2017) - इंग्लंडचा टायमल मिल्स याला RCB ने १२ कोटींना संघात घेतले. तो संपूर्ण हंगामात केवळ ५ सामने खेळला आणि ५ बळीच घेऊ शकला.

मनीष पांडे (IPL 2018) - याला सनरायजर्स हैदराबाद संघाने ११ कोटींच्या बोलीवर संघात घेतले. त्याला संपूर्ण हंगामात १५ सामन्यांत केवळ २८४ धावाच करता आल्या.

जयदेव उनाडकट (IPL 2019) - राजस्थान रॉयल्सने त्याला ८.४० कोटींना विकत घेतले. पण त्याने संपूर्ण हंगामात १०च्या सरासरीने धावा देऊन केवळ १० विकेट्स घेतल्या.

ग्लेन मॅक्सवेल (IPL 2020) - पंजाब किंग्ज संघाने मॅक्सवेलवर १०.७५ कोटींची मोठी बोली लावली होती. पण त्याला केवळ १०८ धावाच करता आल्या. विशेष म्हणजे त्या हंगामात त्याला एकही षटकार मारता आला नाही.

कायल जेमिसन (IPL 2021) - त्याला RCB ने तब्बल १५ कोटी रुपयांच्या बोलीवर विकत घेतले होते. त्याने ९.६१ च्या सरासरीने धावा दिल्या आणि केवळ नऊ गडी बाद केले.

जोफ्रा आर्चर (IPL 2022) - मुंबई इंडियन्सने त्याला ८ कोटींच्या बोलीवर संघात घेतले होते. त्यावर्षी तो दुखापतीमुळे खेळला नाही. पण IPL 2023 मध्ये त्याने केवळ ५ सामने खेळले आणि ५ बळी घेत हंगाम संपवला.

हॅरी ब्रूक (IPL 2023) - हैदराबाद संघाने त्याला १३.२५ कोटींना विकत घेतले होते. त्याने हंगामात केवळ १९० धावा केल्या. त्यात एक शतक होते.

Web Title: IPL auction worst buys of past decade yuvraj pawan negi jamieson mills maxwel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.