IPL Auction 2026 LIVE: नवोदित कार्तिक शर्मा, प्रशांत वीर, अकिब दारवर पैशांचा पाऊस, लागल्या विक्रमी बोली

LIVE

IPL Auction 2026 LIVE: आयपीएल २०२६साठी अबू धाबीच्या एतिहाद अरेना येथे खेळाडूंच्या लिलावाचं आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये  एकूण ३६९ ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2025 19:07 IST2025-12-16T16:02:52+5:302025-12-16T19:07:14+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL Auction 2026 LIVE:ipl auction 2026 live updates indian premier league teams csk rcb mi dc lsg kkr rr pbks gt srh auction abu dhabi | IPL Auction 2026 LIVE: नवोदित कार्तिक शर्मा, प्रशांत वीर, अकिब दारवर पैशांचा पाऊस, लागल्या विक्रमी बोली

IPL Auction 2026 LIVE: नवोदित कार्तिक शर्मा, प्रशांत वीर, अकिब दारवर पैशांचा पाऊस, लागल्या विक्रमी बोली

IPL Auction 2026 LIVE: आयपीएल २०२६साठी अबू धाबीच्या एतिहाद अरेना येथे खेळाडूंच्या लिलावाचं आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये  एकूण ३६९ खेळाडू लिलावात सहभागी झाले असून. यात २५३ भारतीयांसह ११६ परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. मिनी लिलावात १० फ्रँचायझी संघ एकूण ७७ रिक्त जागा भरण्यासाठी लिलावात उतरतील. यात ३१ परदेशी खेळाडूंच्या जागा रिक्त आहेत.  

LIVE

Get Latest Updates

16 Dec, 25 : 07:02 PM

जेसन होल्डर गुजरात टायटन्सकडे, लागली ७ कोटींची बोली

जेसन होल्डर गुजरात टायटन्सकडे, लागली ७ कोटींची बोली 

16 Dec, 25 : 07:01 PM

मुस्तफिझूर रहमान कोलकाता नाईटरायडर्सच्या ताफ्यात, ९ कोटी २० लाखांची लागली बोली

बांगलादेशचा गोलंदाज मुस्तफिझूर रहमान कोलकाता नाईटरायडर्सच्या ताफ्यात, ९ कोटी २० लाखांची लागली बोली 

16 Dec, 25 : 05:48 PM

नमन तिवारी लखनौच्या ताफ्यात, लावली १ कोटी रुपयांची बोली

नमन तिवारी लखनौच्या ताफ्यात, लावली १ कोटी रुपयांची बोली 

16 Dec, 25 : 05:26 PM

कार्तिक शर्मावर विक्रमी बोली, १४.२० कोटींच्या बोलीसह चेन्नई सुपरकिंग्सनं घेतलं संघात 

अनकॅप्ड कार्तिक शर्मावर विक्रमी बोली, १४.२० कोटींच्या बोलीसह चेन्नई सुपरकिंग्सनं घेतलं संघात 

16 Dec, 25 : 05:03 PM

प्रशांत वीरवर १४.२० कोटींची बोली, चेन्नई सुपरकिंग्सनं घेतलं संघात

प्रशांत वीरवर १४.२० कोटींची बोली, चेन्नई सुपरकिंग्सनं घेतलं संघात 

16 Dec, 25 : 04:52 PM

अष्टपैलू अकिब दार दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात, लावली ८.४० कोटींची बोली

अष्टपैलू अकिब दारवर दिल्ली कॅपिटल्सने लावली ८ कोटी ४० लाख रुपयांची बोली 

16 Dec, 25 : 04:30 PM

वनिंदू हसरंगा लखनौ सुपरजायंट्सकडे, लागली २ कोटींची बोली

श्रीलंकन फिरकीपटू वनिंदू हसरंगा लखनौच्या संघात, लखनौ सुपरजायंट्सने हसरंगावर लावली २ कोटींची बोली 

16 Dec, 25 : 04:28 PM

दक्षिण आफ्रिकेचा स्फोटक फलंदाज डेव्हिड मीलरवर दिल्ली कॅपिटल्सकडून २ कोटींची बोली

दक्षिण आफ्रिकेचा स्फोटक फलंदाज डेव्हिड मीलरवर दिल्ली कॅपिटल्सकडून २ कोटींची बोली

16 Dec, 25 : 04:22 PM

भारतीय फिरकीपटू रवी बिश्नोईवर राजस्थान रॉयल्सकडून ७.२ कोटी रुपयांची बोली

भारतीय फिरकीपटू रवी बिश्नोईवर राजस्थान रॉयल्सकडून ७.२ कोटी रुपयांची बोली

16 Dec, 25 : 04:21 PM

कोलकाता नाईटरायडर्सकडून कॅमरून ग्रीनवर विक्रमी २५.२ कोटी रुपयांची बोली

कोलकाता नाईटरायडर्सकडून कॅमरून ग्रीनवर विक्रमी २५.२ कोटी रुपयांची बोली

16 Dec, 25 : 04:19 PM

श्रीलंकन गोलंदाज महिश पतिरानावर केकेआऱनं लावली १८ कोटींची बोली

श्रीलंकन गोलंदाज महिश पतिरानावर कोलकाता नाईडरायडर्सचा मोठा डाव, १८ कोटींच्या बोलीसह घेतलं संघात 

16 Dec, 25 : 04:15 PM

पृथ्वी शॉ, सरफराज खान, आकाश दीप अद्याप अनसोल्ड

 पृथ्वी शॉ, सरफराज खान या धडाकेबाज भारतीय फलंदाजांसह अष्टपैकू आकाश दीप लिलावाच्या पहिल्या फेरीत अनसोल्ड

16 Dec, 25 : 04:13 PM

बेन डकेट दिल्ली कॅपिटल्सकडे, २ कोटी रुपयांची लागली बोली

इंग्लंडचा आक्रमक फलंदाज बेन डकेट याला दिल्ली कॅपिटल्सने २ कोटी रुपयांची बोली लावत आपल्या संघात दाखल करून घेतले. 

  

16 Dec, 25 : 04:08 PM

क्विंटनक डीकॉक पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सकडे, १ कोटी रुपयांची लागली बोली

दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डीकॉक पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसणार आहे. मुंबई इंडियन्सने त्याला १ कोटी रुपयांची बोली लावून ताफ्यात दाखल करून घेतले. 

16 Dec, 25 : 04:06 PM

व्यंकटेश अय्यरला ७ कोटींची लॉटरी, डीकॉक पुन्हा मुंबईच्या ताफ्यात

गेल्या हंगामात कोलकाता नाईटरायडर्सकडून खेळणाऱ्या व्यंकटेश अय्यरला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ७ कोटी रुपयांची बोली लावत खरेदी केले. 

Web Title: IPL Auction 2026 LIVE:ipl auction 2026 live updates indian premier league teams csk rcb mi dc lsg kkr rr pbks gt srh auction abu dhabi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.