Join us  

Deepak Hooda, IPL Auction 2022 Live Updates: दीपक हुडाला ऑक्शनपूर्वी लागली ३५ लाखांची लॉटरी; टीम इंडियामध्ये पदार्पणामुळे नशीब चमकलं

Deepak Hooda, IPL Auction 2022 Live Updates: इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठी होणाऱ्या आजच्या मेगा ऑक्शनआधीच दीपक हुडाला ...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2022 9:36 AM

Open in App

Deepak Hooda, IPL Auction 2022 Live Updates: इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठी होणाऱ्या आजच्या मेगा ऑक्शनआधीच दीपक हुडाला ३५ लाखांची लॉटरी लागली. आयपीएल ऑक्शनमध्ये भारताचा हा अष्टपैलू खेळाडू थेट ड्वेन ब्राव्हो, जेसन होल्डर, शाकिब अल हसन, मोहम्मद नबी आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या पंक्तित जाऊन बसला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे मालिकेतील पदार्पणामुळे त्याचे नशीब बदलले. IPL Auction 2022 News in Marathi

आयपीएल ऑक्शनसाठीच्या सुरुवातीला दीपक हुडा सेट ८ मध्ये स्थान होते आणि ४० लाख अशी त्याची मुळ किंमत होती. पण, वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत त्याने पदार्पण केले आणि त्याचे ७५ लाख मुळ किमतीच्या खेळाडूंमध्ये प्रमोशन झाले. अनकॅप्डमधून तो आता कॅप्ड खेळाडूंमध्ये आला आहे. ५९० खेळाडूंनी आयपीएल लिलावात नावं नोंदवली आहेत. पण आता त्यात १० नवीन खेळाडूंची भर पडली आहे. त्यानुसार आता एकूण ६०० खेळाडूंचा लिलाव होणार आहे. IPL Auction 2022 Latest Marathi News,

बीसीसीआयनं नव्याने सहभागी केलेल्या खेळाडूंमध्ये अग्विवेश अयाची, रोहन राणा , नितिश रेड्डी, हार्दिक तामोरे, मिहिर हिरवानी, साईराज पाटील, मोनू सिंग, निवेदन राधाकृष्णन, लान्स मॉरिस, आरोन हार्डी ( ऑस्ट्रेलियाचे) यांचा समावेश आहे. हार्डी व मॉरिस हे बिग बॅश लीगमध्ये पर्थ स्कॉचर्स संघाकडून खेळले आहेत. राधाकृष्णन हा ऑस्ट्रेलियाच्या अंडर १९ वर्ल्ड कप संघाच सदस्य होता.  IPL Auction 2022 News

६०० खेळाडूंपैकी आज ९८ खेळाडूंवर बोली लावणार आहे आणि रविवारी लंच ब्रेकपर्यंत १६१ खेळाडूंवर बोली पूर्ण करण्यात येणार आहे. पहिल्या सहा सेट्समद्ये ५४ कॅप्ड खेळाडूंचा समावेश आहे आणि ७व्या सेटनंतर अनकॅप्ड खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे. 

टॅग्स :आयपीएल लिलावआयपीएल २०२२बीसीसीआय
Open in App