Big News : IPL 2022 Mega Auction मध्ये झाली आणखी १० खेळाडूंची एन्ट्री, ठरणार गेम चेंजर; आता ५९० नव्हे तर ६०० खेळाडूंवर लागणार बोली

Indian Premier League Players Mega Auction 2022  Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठी होणाऱ्या मेगा ऑक्शनमध्ये अखेरच्या क्षणाला बदल झाला आहे. ५९० खेळाडूंनी आयपीएल लिलावात नावं नोंदवली आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 10:27 PM2022-02-11T22:27:18+5:302022-02-12T10:52:31+5:30

whatsapp join usJoin us
IPL-auction-2022-live-updates-ipl-auction-news-2022-live-streaming-marathi - BCCI adds U19 World Cup winning India players to IPL auction register, total number of players in the auction register is now 600 | Big News : IPL 2022 Mega Auction मध्ये झाली आणखी १० खेळाडूंची एन्ट्री, ठरणार गेम चेंजर; आता ५९० नव्हे तर ६०० खेळाडूंवर लागणार बोली

Big News : IPL 2022 Mega Auction मध्ये झाली आणखी १० खेळाडूंची एन्ट्री, ठरणार गेम चेंजर; आता ५९० नव्हे तर ६०० खेळाडूंवर लागणार बोली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Indian Premier League Players Mega Auction 2022  Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठी होणाऱ्या मेगा ऑक्शनमध्ये अखेरच्या क्षणाला बदल झाला आहे. ५९० खेळाडूंनी आयपीएल लिलावात नावं नोंदवली आहेत. त्यात २०३ गोलंदाज, १०२ फलंदाज, २२७ अष्टपैलू आणि ५८ यष्टिरक्षकांचा समावेश आहे. पण, यापैकी पहिल्या दिवशी केवळ १६१ खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे आणि तुम्हाला माहित्येक का कोणत्या खेळाडूंपासून लिलावाला सुरुवात होणार आहे.  पण, यामध्ये आता १० नवीन खेळाडूंची भर पडली आहे. BCCIने अखेरच्या क्षणाला या १० खेळाडूंची एन्ट्री स्वीकारली आहे आणि त्यामुळे आता एकूण ६०० खेळाडूंवर बोली लागणार आहे.IPL Auction 2022

बीसीसीआयनं अंडर १९ वर्ल्ड कप स्पर्धेच्या विजयी संघातील १० खेळाडूंचा लिलावात सहभाग करून घेतला असल्याचे वृत्त Cricbuzz ने दिले होते. त्यात त्यांनी आयपीएल चेअरमन ब्रिजेश पटेल यांचा हवाला दिला होता. पटेल सांगितले की,  लिलावात आम्ही १० नवीन खेळाडूंचा समावेश केला आहे, हे वृत्त खरं आहे.'' शुक्रवारी मेगा ऑक्शनपूर्वी सर्व फ्रँचायझींसोबत बीसीसीआयची बैठक पार पडली आणि त्यात हे जाहीर केले गेले.  IPL Auction 2022 Latest Marathi News 

बीसीसीआयच्या नियमानुसार अनकॅप ( राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व न केलेला खेळाडू) खेळाडूला ऑक्शनसाठी पात्र होण्यासाठी दोन नियमांची पुर्तता करणे गरजेचे आहे.  पहिला- खेळाडूचे वय १९ वर्षांपेक्षा अधिक असायला हवे , दुसरा - जर त्याचं वय १९ वर्षांखालील असेल तर किमान त्याने राज्याच्या संघाकडून किमान एक लिस्ट ए सामना ( वरिष्ठ स्तरावर) खेळायला हवा. यानुसार हरयाणाचा दिनेश बाना, आंध्रप्रदेशचा शेख राशीद यांच्यासह अंगक्रिष रघुवंशी, मानव पारख, निशांत सिंधू, ग्राव सांगवान, रवी कुमार व सिद्धार्थ यादव हे खेळाडू बीसीसीआयच्या नियमानुसार आयपीएल ऑक्शनसाठी पात्र ठरत नाही.IPL Auction 2022 News, IPL Auction 2022 Live Streaming

बीसीसीआयनं नव्याने सहभागी केलेल्या खेळाडूंची नावे  ( २० लाख मुळ किंमत) - अग्विवेश अयाची, रोहन राणा , नितिश रेड्डी, हार्दिक तामोरे, मिहिर हिरवानी, साईराज पाटील, मोनू सिंग, निवेदन राधाकृष्णन, लान्स मॉरिस, आरोन हार्डी ( ऑस्ट्रेलियाचे) (  The 10 additions are with 20L base price: Agnivesh Ayachi, Rohan Rana, Nitish Reddy, Hardik Tamore,Mihir Hirwani, Sairaj Patil, Monu Singh (Indians), Nivethan Radhakrishnan, Lance Morris, Aaron Hardie (Australians)) 

Web Title: IPL-auction-2022-live-updates-ipl-auction-news-2022-live-streaming-marathi - BCCI adds U19 World Cup winning India players to IPL auction register, total number of players in the auction register is now 600

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.