IPL Auction 2022 Live Updates : ४३१ कोटी...! मागील ९ ऑक्शनमध्ये पडलाय पैशांचा पाऊस, यंदा हे सर्व विक्रम तुटणार!

IPL Auction 2022 Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठी आज आणि उद्या ऑक्शन होणार आहे. बीसीसीआयने काल १० खेळाडूंची नावं जोडली आणि त्यामुळे एकूण ६०० खेळाडू ऑक्शनच्या रिंगणात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2022 10:17 AM2022-02-12T10:17:43+5:302022-02-12T10:21:25+5:30

whatsapp join usJoin us
IPL Auction 2022 Live Updates : How much money was spent in the last 9 IPL Auctions?, know all details  | IPL Auction 2022 Live Updates : ४३१ कोटी...! मागील ९ ऑक्शनमध्ये पडलाय पैशांचा पाऊस, यंदा हे सर्व विक्रम तुटणार!

IPL Auction 2022 Live Updates : ४३१ कोटी...! मागील ९ ऑक्शनमध्ये पडलाय पैशांचा पाऊस, यंदा हे सर्व विक्रम तुटणार!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL Auction 2022 Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठी आज आणि उद्या ऑक्शन होणार आहे. बीसीसीआयने काल १० खेळाडूंची नावं जोडली आणि त्यामुळे एकूण ६०० खेळाडू ऑक्शनच्या रिंगणात आहे. ६०० खेळाडूंपैकी आज ९८ खेळाडूंवर बोली लावणार आहे आणि रविवारी लंच ब्रेकपर्यंत १६१ खेळाडूंवर बोली पूर्ण करण्यात येणार आहे. पहिल्या सहा सेट्समद्ये ५४ कॅप्ड खेळाडूंचा समावेश आहे आणि ७व्या सेटनंतर अनकॅप्ड खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे. यावेळेत ऑक्शनमधील सर्व विक्रम मोडले जाण्याची शक्यता आहे. मागील ऑक्शनमध्ये जवळपास १४५ कोटींचा पाऊस पडला होता...

मागील ९ ऑक्शनमध्ये किती रक्कम मोजली गेलीय ते पाहुयात....

  • २०१३ - ३७ खेळाडूंवर बोली लावली गेली आणि त्यापैकी ३१ खेळाडू हे परदेशी होते - $11,885,000 ( ग्लेन मॅक्सवेल महागडा खेळाडू - $1,000,000, मुंबई इंडियन्स) 
  • २०१४ - १५४ खेळाडूंवर बोली आणि त्यात ५० परदेशी खेळाडूंचा समावेश - 2,62,60,00,000 ( महागडा खेळाडू - युवराज सिंग -१४ कोटी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू) 
  • २०१५ - ६७ खेळाडूंवर यशस्वी बोली आणि त्यापैकी २४ खेळाडू परदेशी - 87,60,00,000 ( महागडा खेळाडू - युवराज सिंग - १६ कोटी, दिल्ली डेअरडेव्हिल्स) 
  • २०१६ - ९४ खेळाडूंवर बोली आणि २७ परदेशी खेळाडू - 1,36,00,00,000 ( महागडा खेळाडू - शेन वॉटसन - ९.५० कोटी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू)  
  • २०१७ - ६६ खेळाडूंवर बोली आणि २७ परदेशी खेळाडू - 91,15,00,000 ( महागडा खेळाडू - बेन स्टोक्स - १४.५० कोटी, रायझिंग पुणे सुपरजायंट्स)
  • २०१८ - १६९ खेळाडूंवर बोली आणि त्यापैकी ५६ परदेशी खेळाडू - 4,31,70,00,000 ( महागडा खेळाडू - बेन स्टोक्स - १२.५० कोटी, राजस्थान रॉयल्स)
  • २०१९ - ६० खेळाडूंवर बोली आणि त्यापैकी २० परदेशी खेळाडू - 1,06,80,00,000 ( महागडा खेळाडू - जयदेव उनाडकत - ८.४० कोटी, राजस्थान रॉयल्स)
  • २०२० - ६२ खेळाडूंपैकी २९ परदेशी खेळाडूंवर बोली - 1,40,30,00,000 ( महागडा खेळाडू - पॅट कमिन्स - १५.५० कोटी, कोलकाता नाइट रायडर्स)
  • २०२१ - ५७ खेळाडूंवर बोली आणि त्यापैकी २२ खेळाडू परदेशी - 1,45,30,00,000 ( महागडा खेळाडू - क्रिस मॉरिस- १६.२५ कोटी, राजस्थान रॉयल्स) 

Web Title: IPL Auction 2022 Live Updates : How much money was spent in the last 9 IPL Auctions?, know all details 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.