IPL Auction 2021 : चेन्नईत झालेल्या आयपीएल ऑक्शनमध्ये सर्वांचे लक्ष लागले होते ते महान फलंदाज सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर ( Arjun Tendulkar) याच्याकडे. आयपीएल ऑक्शनपूर्वी मुंबईत झालेल्या पोलिस ढाल क्रिकेट स्पर्धेत अर्जुननं अष्टपैलू कामगिरी केली होती. त्यामुळे त्याला कोणती फ्रँचायझी ताफ्यात घेईल याची सर्वांना उत्सुकता होती. पण, अखेरपर्यंत त्याचे नाव आलेच नाही, तरीही सोशल मीडियावर #ArjunTendulkar ट्रेंड होत होता. त्याला कारण ठरले ते सचिन बेबी ( Sachin Baby) याचे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं २० लाख या मुळ किमतीत केरळच्या ३२ वर्षीय खेळाडूला आपल्या ताफ्यात घेतले. त्यावरुन नेटिझन्स ट्रोल करू लागले.