Join us

IPL Auction 2021: चेन्नईने दाखवलेल्या विश्वासानंतर चेतेश्वर पुजाराने मानले आभार; ट्विट करत म्हणाला...

पुजाराचे आयपीएलमध्ये पुनरागमन झालेलं पाहून सर्वांना आनंद झाला आहे. 

By मुकेश चव्हाण | Updated: February 18, 2021 20:00 IST

Open in App

IPL Auction 2021 :  कसोटी फलंदाज म्हणून ठपका लागलेला चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara) तब्बल ७ वर्षांनी आयपीएलमध्ये कमबॅक करणार आहे. चेन्नई सुपर किंग्सनं त्याला ५० लाखांच्या बेस प्राईजमध्ये आपल्या ताफ्यात घेतले. CSKच्या चमूत त्याचं नाव निश्चित झाल्यानंतर सर्व सदस्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. पुजारानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यापाठोपाठ इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतही टीम इंडियासाठी 'मि. डिपेंडेबल'ची भूमिका बजावली. प्रतिस्पर्धी गोलंदाजांचा मारा शरिरावर झेलून तो टीम इंडियासाठी मजबूत भींतीसारखा खेळपट्टीवर अडून बसला होता. त्यामुळे आता पुजाराचे आयपीएलमध्ये पुनरागमन झालेलं पाहून सर्वांना आनंद झाला आहे. 

विश्वास दर्शवल्याबद्दल धन्यवाद, असं ट्विट चेतेश्वर पुजाराने केला आहे. 

२०१४मध्ये पुजारा किंग्स इलेव्हन पंजाबकडून खेळला होता. त्यानंतर तो आयपीएलपासून दूरच होता. पूजारा संघात दाखल झाल्यामुळे CSKला मधल्या फळीत आधार मिळू शकतो. पुजारानं आयपीएलच्या ३० सामन्यांत ३९० धावा केल्या आहेत. त्यात एका अर्धशतकाचा समावेश आहे. 

टॅग्स :चेतेश्वर पुजाराचेन्नई सुपर किंग्सएम. एस. धोनीआयपीएल २०२१ मिनी ऑक्शनआयपीएल