Join us  

IPL Auction 2020: चेन्नई सुपर किंग्स सर्वांची 'फिरकी' घेणार; टीम पाहून तुम्हालाही हे पटेल

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) पुढील मोसमासाठी कोलकाता येथे आज खेळाडूंचा लिलाव होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2019 5:29 PM

Open in App

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) पुढील मोसमासाठी कोलकाता येथे आज खेळाडूंचा लिलाव होणार आहे. 73 जागांसाठी 338 खेळाडू रिंगणार आहेत. या यादित 190 भारतीय, 145 परदेशी आणि 3 संलग्न देशांतील खेळाडूंचा समावेश आहे. पहिल्याच प्रयत्नात मुंबई इंडियन्सनं ख्रिस लीनला दोन कोटी मूळ किमतीत आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या अॅरोन फिंचनं मोठी बोली लागली. विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं त्याला आपल्या ताफ्यात घेतले. पण, ऑसींच्याच ग्लेन मॅक्सवेलसाठी किंग्स इलेव्हन पंजाबनं 10.75 कोटी मोजली. मात्र, पॅट कमिन्सनं याही पुढे जात रेकॉर्ड तोड कमाई केली. पण, आयपीएलच्या पुढील मोसमात चेन्नई सुपर किंग्स सर्वांची फिरकी घेणार. कसे चला पाहूया...

या लिलावात पहिलेच नाव कोलकाता नाइट रायडर्सनं रिलीज केलेल्या ख्रिस लीनचं नाव आलं. या खेळाडूसाठी चुरस पाहायला मिळेल अशी अपेक्षा होती, परंतु मुंबई इंडियन्स या एकमेव संघानं त्याच्यासाठी बोली लावली. मुंबईनं 2 कोटीच्या मूळ किमतीत त्याला आपल्या ताफ्यात घेतले. कोलकाता नाइट रायडर्स ( KKR) संघानं रिलीज केले होते. एक कोटी मूळ किंमत असलेल्या फिंचला RCBनं 4.40 कोटींत आपल्या ताफ्यात करून घेतलं. आयपीएलमधील त्याचा हा आठवा संघ आहे. यापूर्वी त्यानं राजस्थान रॉयल्स ( 2010), दिल्ली डेअरडेव्हिल्स ( 2011-12), पुणे वॉरियर्स इंडिया ( 2013), सनरायझर्स हैदराबाद ( 2014), मुंबई इंडियन्स ( 2015), गुजरात लायन्स ( 2016-17) आणि किंग्स इलेव्हन पंजाब ( 2018)  आदी संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. 

त्यानंतर ग्लेन मॅक्सवेलसाठी किंग्स इलेव्हन पंजाबनं 10.75 कोटी मोजले. त्याची मूळ किंमत 2 कोटी होती. पण, कमिन्सनं हा विक्रम मोडला. त्याला कोलकाता नाइट रायडर्सनं 15.50 कोटीत खरेदी केले. आयपीएलच्या लिलावात ही दुसरी सर्वोत्तम बोली ठरली. यात युवराज सिंग 16 कोटींसह ( दिल्ली कॅपिटल्स 2015) अव्वल स्थानावर आहे. या यादीत बेन स्टोक्स ( 14.50 कोटी), युवराज ( 14 कोटी), दिनेश कार्तिक ( 12.50 कोटी), बेन स्टोक्स ( 12.50 कोटी) आणि टायमल मिल्स ( 12 कोटी) यांचा क्रमांक येतो. 

मुंबई इंडियन्सनन नॅथन कोल्टर नीलला 8 कोटींत आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. त्यामुळे मुंबईच्या गोलंदाजीता धार मिळाली आहे. कोल्टर मुंबई इंडियन्सकडे गेल्यानं चेन्नई सुपर किंग्सनं नाराजी व्यक्त केली. पण, चेन्नईनं पियुष चावलासाठी 6.75 कोटी मोजून सर्वांना धक्का दिला. दोन वर्ल्ड कप आणि 3 आयपीएल जेतेपदं नावावर असलेल्या पियुषला संघात घेत चेन्नईनं पुढील मोसमात अन्य संघांची फिरकी घेण्याचा डाव आखला आहे. पियुषच्या समावेशामुळे चेन्नईकडे सहा फिरकीपटू झाले आहे. 

CSK चे फिरकीपटू - इम्रान ताहीर, हरभजन सिंग, पियुष चावला, रवींद्र जडेजा, मिचेल सँटनर आणि कर्ण शर्मा

टॅग्स :आयपीएल लिलाव 2020आयपीएल 2020चेन्नई सुपर किंग्स