Join us  

IPL Auction 2020: टीम इंडियाचा कर्णधार अन् विराट सनरायझर्स हैदराबादच्या ताफ्यात 

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) पुढील मोसमासाठी कोलकाता येथे आज खेळाडूंचा लिलाव होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2019 5:42 PM

Open in App

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) पुढील मोसमासाठी कोलकाता येथे आज खेळाडूंचा लिलाव होणार आहे. 73 जागांसाठी 338 खेळाडू रिंगणार आहेत. या यादित 190 भारतीय, 145 परदेशी आणि 3 संलग्न देशांतील खेळाडूंचा समावेश आहे. पहिल्याच प्रयत्नात मुंबई इंडियन्सनं ख्रिस लीनला दोन कोटी मूळ किमतीत आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या अॅरोन फिंचनं मोठी बोली लागली. विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं त्याला आपल्या ताफ्यात घेतले. पण, ऑसींच्याच ग्लेन मॅक्सवेलसाठी किंग्स इलेव्हन पंजाबनं 10.75 कोटी मोजली. मात्र, पॅट कमिन्सनं याही पुढे जात रेकॉर्ड तोड कमाई केली. 

लिलावाच्या तिसऱ्या फेरीत सनरायझर्स हैदराबादनं टीम इंडियाचा कर्णधार अन विराटला आपल्या ताफ्यात करून घेतले. पण, हा कर्णधार विराट कोहली नाही. पुढील वर्षी दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या 19 वर्षांखालील वर्ल्ड कप संघासाठीच्या टीम इंडियाचा कर्णधार प्रियाम गर्ग आणि झारखंडचा विराट सिंग यांना हैदराबादनं आपल्या ताफ्यात घेतले. विराट आणि प्रियाम यांच्यासाठी हैदराबादनं प्रत्येकी 1.9 कोटी मोजले. विराटनं  सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत 10 डावांत 57.16च्या सरासरीनं 343 धावा केल्या आहेत, तर पुढील वर्षी होणाऱ्या 19 वर्षांखालील वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचे नेतृत्व प्रियामच्या खांद्यावर सोपवण्यात आले आहे. त्यानं देवधर चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात 74 धावांची खेळी करताना संघाला विजय मिळवून दिला होता.

टॅग्स :आयपीएल लिलाव 2020आयपीएल 2020सनरायझर्स हैदराबाद