Join us  

IPL Auction  2020 : टीम इंडियाची धुलाई करणाऱ्या शिमरोन हेटमायरचं नशीब फळफळलं..

रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरूच्या या खेळाडूसाठी रंगली चुरस...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2019 6:39 PM

Open in App

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) पुढील मोसमासाठी कोलकाता येथे आज खेळाडूंचा लिलाव होणार आहे. 73 जागांसाठी 338 खेळाडू रिंगणार आहेत. या यादित 190 भारतीय, 145 परदेशी आणि 3 संलग्न देशांतील खेळाडूंचा समावेश आहे. पहिल्याच प्रयत्नात मुंबई इंडियन्सनं ख्रिस लीनला दोन कोटी मूळ किमतीत आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या अॅरोन फिंचनं मोठी बोली लागली. विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं त्याला आपल्या ताफ्यात घेतले. पण, ऑसींच्याच ग्लेन मॅक्सवेलसाठी किंग्स इलेव्हन पंजाबनं 10.75 कोटी मोजली. मात्र, पॅट कमिन्सनं याही पुढे जात रेकॉर्ड तोड कमाई केली. 

या लिलावात वेस्ट इंडिजच्या शिमरोन हेटमारयनंही भाव खाल्ला. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात सुरु असलेल्या वन डे मालिकेत हेटमायर आणि शे होप यांनी भारतीय गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली होती. शे होप अनसोल्ड राहिल्यानंतर हेटमारयरला किती बोली लागते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यात एव्हीन लुइसही अनसोल्ड राहिला. हेटमायरही अनसोल्ड राहतो की काय असे चित्र होते, परंतु अखेरच्या क्षणाला कोलकाता नाइट रायडर्सनं त्याच्यावर बोली लावली. 50 लाख मूळ किंमत असलेल्या या खेळाडूनं 20 ट्वेंटी-20 सामन्यांत 125.70 च्या स्ट्राइक रेटनं 279 धावा चोपल्या आहेत. पहिल्या वन डे सामन्यात त्यानं 139 धावांची वादळी खेळी केली होती आणि त्याची पोचपावती त्याला मिळाली. दिल्ली कॅपिटल्स संघानं त्याच्यासाठी 7.75 कोटी रुपये मोजले.  पहिल्या फेरीअखेरीस[5:03 PM, 12/19/2019] swadesh ghanekar: खेळाडू         मूळ किंमत    संघ            किंमतअॅरोन फिंच    1 कोटी        रॉयल चॅलेंजर्सं बंगळुरू    4.40 कोटीख्रिस लीन    2 कोटी        मुंबई इंडियन्स        2 कोटीइयॉन मॉर्गन    1.5 कोटी        कोलकाता नाइट रायडर्स    5.25 कोटीचेतेश्वर पुजारा    50 लाख        खरेदी केले नाह        जेसन रॉय    1.50 कोटी    दिल्ली कॅपिटल्स        1.50 कोटीरॉबीन उथप्पा    1.50 कोटी    राजस्थान रॉयल्स        3 कोटीहनुमा विहारी    50 लाख        खरेदी केले नाहीस्टुअर्ट बिन्नी    50 लाख        खरेदी केले नाहीपॅट कमिन्स    2 कोटी        कोलकाता नाइट रायडर्स    15.50 कोटीसॅम कुरन        1 कोटी        चेन्नई सुपर किंग्स        5.50 कोटीकॉलीन डी ग्रँडहोम    75 लाख        खरेदी केले नाहीग्लेन मॅक्सवेल    2 कोटी        किंग्स इलेव्हन पंजाब    10.75 कोटीख्रिस मॉरिस    1.50 कोटी    रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू    10 कोटीयुसूफ पठाण    1 कोटी        खरेदी केले नाही        ख्रिस वोक्स    1.50 कोटी    दिल्ली कॅपिटल्स        1.50 कोटी 

- IPL Auction 2020: पॅक कमिन्सची रेकॉर्ड तोड कमाई, KKRनं मोजली तगडी रक्कम

- IPL Auction 2020 : मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात स्फोटक फलंदाज; टी10 लीगमध्ये पाडलेला धावांचा पाऊस

- IPL Auction 2020: ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अ‍ॅरोन फिंचला मोठी बोली; RCBनं मारली बाजी

- IPL Auction 2020: टीम इंडियाचा कर्णधार अन् विराट सनरायझर्स हैदराबादच्या ताफ्यात 

- IPL Auction 2020: पहिल्या फेरीत कोणाला सर्वाधिक बोली, कोण राहिलं Unsold?

-  IPL Auction 2020: मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात 'तो' परतला, लसिथ मलिंगाला मोठा दिलासा मिळाला

- IPL Auction 2020: चेन्नई सुपर किंग्स सर्वांची 'फिरकी' घेणार; टीम पाहून तुम्हालाही हे पटेल

- IPL Auction 2020: 'पाणीपुरी'वाल्या पोराची 'रॉयल' भरारी; यशस्वीला २.४ कोटींची 'लॉटरी'

टॅग्स :आयपीएल लिलाव 2020आयपीएल 2020दिल्ली कॅपिटल्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरभारत विरुद्ध वेस्ट इंडिज