Join us  

IPL Auction 2020: इतिहासात प्रथमच 48 वर्षांचा तरूणावर लागली यशस्वी बोली, जाणून घ्या कोण आहे तो

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) पुढील मोसमासाठी कोलकाता येथे खेळाडूंचा लिलाव सुरू आहे.  

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2019 8:51 PM

Open in App

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) पुढील मोसमासाठी कोलकाता येथे खेळाडूंचा लिलाव झाला.  73 जागांसाठी 338 खेळाडू रिंगणार आहेत. या यादित 190 भारतीय, 145 परदेशी आणि 3 संलग्न देशांतील खेळाडूंचा समावेश आहे. पहिल्याच प्रयत्नात मुंबई इंडियन्सनं ख्रिस लीनला दोन कोटी मूळ किमतीत आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या अॅरोन फिंचनं मोठी बोली लागली. विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं त्याला आपल्या ताफ्यात घेतले. पण, ऑसींच्याच ग्लेन मॅक्सवेलसाठी किंग्स इलेव्हन पंजाबनं 10.75 कोटी मोजली. मात्र, पॅट कमिन्सनं याही पुढे जात रेकॉर्ड तोड कमाई केली. दुपारी 3.30 वाजल्यापासून सुरू झालेल्या या लिलावाच्या पहिल्या सत्रात म्हणजे साडे तीन तासांत तब्बल 1 अब्ज रक्कमेची उलाढाल झाली.

लिलावाच्या पहिल्या सत्रात पॅट कमिन्सला सर्वाधिक 15.50 कोटी रक्कम मिळाले. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेल ( 10.75 कोटी), ख्रिस मॉरिस ( 10 कोटी), शेल्डन कोट्रेल ( 8.50 कोटी) आणि नॅथन कोल्टर नील ( 8 कोटी) यांचा क्रमांक येतो. सायंकाळी सात वाजेपर्यंत 33 खेळाडूंवर बोली लागली होती, तर 17 खेळाडू अनसोल्ड राहिले होते. 33 खेळाडूंसाठी आठ संघांनी मिळून एकूण 1 अब्ज 17 कोटी 55 लाख रक्कम मोजली होती. एकीकडे युवा खेळाडूंना ताफ्यात घेण्यासाठी चुरस रंगलेली असताना कोलकाता नाइट रायडर्सनं 48 वर्षांच्या खेळाडूला आपल्या संघात घेतले. 

आयपीएलच्या इतिहासात तो सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. प्रविण तांबे असे या खेळाडूचे नाव असून त्याला कोलकातानं 20 लाखांच्या मूळ किंमतीत आपल्या संघात घेतले. 48 वर्षीय या फिरकीपटूनं आयपीएलमध्ये आतापर्यंत राजस्थान रॉयल्स, गुजरात लायन्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. 2014मध्ये राजस्थानकडून खेळताना त्यानं 13 सामन्यांत 15 विकेट्स घेतल्य होत्या, परंतु पुढील दोन मोसमात त्याला समाधानकारक कामगिरी करता आली नाही. तीन वर्षांपूर्वी तो आयपीएलमध्ये खेळला होता आणि तो सध्या स्पर्धात्मक सामन्यातही खेळत नाही. 

 

टॅग्स :आयपीएल लिलाव 2020आयपीएल 2020कोलकाता नाईट रायडर्स