Join us  

IPL Auction 2019 : जाणून घ्या, लिलावात कोणत्या संघाकडे किती पैसे!

इंडियन प्रीमिअर लीगच्या 2019 मध्ये होणाऱ्या हंगामासाठी 18 डिसेंबरला जयपूर येथे लिलाव होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2018 11:37 AM

Open in App

मुंबई : इंडियन प्रीमिअर लीगच्या 2019 मध्ये होणाऱ्या हंगामासाठी 18 डिसेंबरला जयपूर येथे लिलाव होणार आहे. यंदाची ही लिलाव प्रक्रिया एक दिवस चालणार आहे आणि 12व्या सत्रासाठी 70 खेळाडू लिलावासाठी उपलब्ध आहेत. यात 50 भारतीय आणि 20 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. 

किंग्ज इलेव्हन पंजाबभारतीय संघाचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागने पंजाब संघाचे मार्गदर्शकपद सोडले. पंजाबने संघातील केवळ 10 खेळाडूंना कायम राखले आहे. संघाला चार परदेशी आणि 6 भारतीय खेळाडूंना घेण्याची संधी आहे. पंजाब संघाकडे 36.2 कोटी रुपये शिल्लक आहेत. 

चेन्नई सुपर किंग्जगतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जने 23 खेळाडूंना कायम राखले आहे. त्यांनी केवळ तीनच खेळाडूंना करारमुक्त केले. लिलावात ते दोन खेळाडू चमूत दाखल करून घेऊ शकतात आणि त्यांच्याकडे 8.4 कोटी रुपये आहेत. 

दिल्ली डेअरडेव्हिल्सभारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवनला आपल्या चमूत घेत दिल्लीने मोठे यश मिळवले आहे. 11 वर्षांनंतर धवनचे दिल्ली संघात पुनरागमन होणार आहे. दिल्लीने 15 खेळाडूंना कायम राखले असून ते अजून 13 खेलाडू घेऊ शकतात. त्यांच्याकडे 25.5 कोटी रुपये आहेत. 

कोलकाता नाईट रायडर्सकोलकाताने ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज मिचेल स्टार्कला संघाबाहेरचा रस्ता दाखवला आहे. संघाने 13 खेळाडूंना कायम राखले आहे आणि त्यांच्याकडे 15.2 कोटी रुपये आहेत. 

मुंबई इंडियन्स तीन वेळा आयपीएल जेतेपद पटकावणाऱ्या मुंबईने 18 खेळाडूंना कायम राखले आहे. संघ अजून 6 खेळाडूंना चमूत दाखल करून घेऊ शकतो आणि त्यांच्याकडे 11.15 कोटी रुपये आहेत. 

राजस्थान रॉयल्सराजस्थानकडे 20.9 कोटी रुपये असून त्यांनी गत हंगामातील सर्वात महागडा खेळाडू जयदेव उनाडकटला करारमुक्त केले आहे. त्यांनी कर्णधार स्टीव्हन स्मिथला कायम राखले आहे. 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघाकडे 18.15 कोटी आहेत आणि ते 12 खेळाडू घेण्याचा प्रयत्न करणारर आहेत. 

सनरायजर्स हैदराबादऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरला कायम राखण्याच्या निर्णयानंतर हैदराबाद संघाकडे सात खेळाडूंना घेण्यासाठी 9.70 कोटी रुपये आहेत.

टॅग्स :आयपीएल लिलावबीसीसीआयइंडियन प्रीमिअर लीगआयपीएलआयपीएल लिलाव 2019