Join us  

IPL Auction 2018: जयदेवला पुन्हा देव पावला, राजस्थानची ८ कोटींची बोली

भारतीय संघातील मोहम्मद शमी आणि इशातं शर्मा यांच्यापेक्षाही संघात नसलेल्या एका गोलंदाजाला दमदार भाव मिळाल्याचे पाहायला मिळाले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2018 5:18 PM

Open in App

मुंबई, आयपीएल लिलाव 2019 :  एखादा खेळाडू भारतीय संघात खेळत असेल, चांगली कामगिरी करत असेल तर त्याला आयपीएलच्या लिलावात चांगला भाव मिळब शकतो. पण संघातील मोहम्मद शमी आणि इशातं शर्मा यांच्यापेक्षाही संघात नसलेल्या एका गोलंदाजाला दमदार भाव मिळाल्याचे पाहायला मिळाले आहे. हा गोलंदाज आहे जयदेव उनाडकट...

जयदेव उनाडकट यावेळी भारतीय संघात नाही. पण तरीही राजस्थान रॉयल्सने त्याच्यासाठी आठ कोटी 40 लाख रुपये मोजले आहेत. गेल्यावर्षी उनाडकटला सर्वाधिक जवळपास 15 कोटींची बोली लागली होती. यावेळी उनाडकटच्या किंमतीमध्ये घट झाली आहे. पण तरीदेखील इशांत आणि शमी यांच्यापेक्षा त्याला जास्त भाव मिळाला आहे.

 

टॅग्स :आयपीएलआयपीएल लिलावआयपीएल लिलाव 2019