Join us  

IPL Auction 2018 : या संघात आहेत वयस्कर खेळाडू, 10 खेळाडूंनी केली तिशी पार

इंडियन प्रीमियर लीगच्या 11व्या पर्वातील लिलावाच्या दुस-या दिवशी बोली अखेर संपुष्टात आली आहे. आयपीएलमध्ये खेळण्यासाठी तरुण आणि तंदुरुस्त खेळाडूंच्या संघाला सर्वाधिक बलशाली समजलं जातं.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2018 6:02 PM

Open in App

बंगळुरू- इंडियन प्रीमियर लीगच्या 11व्या पर्वातील लिलावाच्या दुस-या दिवशी बोली अखेर संपुष्टात आली आहे. आयपीएलमध्ये खेळण्यासाठी तरुण आणि तंदुरुस्त खेळाडूंच्या संघाला सर्वाधिक बलशाली समजलं जातं. परंतु आयपीएलमध्ये यंदा चेन्नई सुपरकिंग्ज संघात वयस्कर क्रिकेटपटूंचा सर्वाधिक भरणा आहे. त्यामुळे चेन्नई सुपरकिंग्ज संघ यंदाच्या आयपीएलमधील सर्वात वयस्कर संघ म्हणून ओळखला जाऊ शकतो.चेन्नईच्या संघाची सूत्रं भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एम. एस. धोनीच्या हातात आहेत. तो स्वतः 36 वर्षांचा आहे. धोनीच्या नेतृत्वाखालील या टीमनं दोनदा आयपीएल चॅम्पियन ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. तर या संघातील 10 खेळाडूंनी तिशी पार केलेली आहे. चेन्नई सुपरकिंग्जमध्ये सर्वाधिक वयस्कर खेळाडू हा दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज इम्रान ताहीर आहे. त्याचं वय जवळपास 38 वर्षांच्या घरात आहे. तर तरुण तडफदार भारतीय खेळाडू रवींद्र जडेजा हा 29 वर्षांचा आहे. इतर खेळाडू सुरेश रैना(31), शेन वॉटसन(36), ड्वेन ब्रावो(36) वयाचे आहेत. यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नईनं मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार आणि फिरकी गोलंदाज हरभजन सिंहलाही खरेदी केलं आहे. भज्जीला 2 कोटींच्या बोलीवर खरेदी करण्यात आलं असून, त्याचं वय 36 वर्षं आहे. तर केदार जाधव(32), अंबाती रायडू(32), दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी संघाचा कर्णधार फाफ डुप्लेसिस(33) आणि कर्ण शर्मा (30) हे खेळाडू टीमचा एक भाग आहेत. अष्टपैलू खेळाडू केदार जाधवची 7 कोटी 80 लाखांत खरेदीकर्णधार महेंद्र सिंह धोनी याचा भरवशाचा खेळाडू महाराष्ट्राचा केदार जाधव हा चेन्नई सुपरकिंग्जच्या ताफ्यात सामील झालाया. फलंदाज, ऑफ स्पिनर आणि पर्यायी यष्टिरक्षक या त्याच्या क्षमतेवर सीएसकेने त्याला 7 कोटी 80 लाख रुपयात विकत घेतले आहे. अष्टपैलू कौशल्य असलेल्या केदारची बेस प्राईस 2 कोटी रुपये होती. चेन्नई सुपर किंग्जने केदारला 7.8 कोटी रुपयांना विकत घेतले. फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही जाधवच्या जमेच्या बाजू आहेत. मधल्याफळीत फलंदाजी करणारा केदार जाधव गरज असताना फटकेबाजी करु शकतो आणि प्रसंगी उपयुक्त ऑफस्पिन गोलंदाजी करतो. केदार जाधव मूळचा पुण्याचा असून टीम इंडियाकडून खेळताना त्याने आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. केदार जाधवने 37 एकदिवसीय सामन्यात 797 धावा केल्या आहेत. यात दोन शतके आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे.  नऊ टी-20 सामन्यात केदारच्या 122 धावा असून यात एका अर्धशतकाचा समावेश आहे. केदार याआधी आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, दिल्ली डेअरडेव्हिल्स, कोच्ची टस्कर्स या संघाकडून खेळला आहे.  

टॅग्स :आयपीएल 2018आयपीएल लिलाव 2018