लखनऊच्या एकाना क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध सामन्यात आयपीएलमधील मोठा विक्रम तुटला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने २०० धावांचा टप्पा ओलांडला. आयपीएल २०२५ मध्ये सर्वाधिक वेळा २०० किंवा त्यापेक्षा धावा झाल्या आहेत. हा एक मोठा विक्रम आहे. आयपीएलच्या गेल्या हंगामात एकूण ४१ वेळा २००+ धावा झाल्या होत्या.
आयपीएल २०२५ मध्ये गुजरात टायटन्सने सर्वाधिक सात वेळा २०० धावांचा टप्पा ओलांडला आहे. पंजाब किंग्जने एकूण सहा वेळा अशी कामगिरी बजावली. या यादीत लखनौ सुपर जांयट्स तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांनी पाच वेळा २०० किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या आहेत. यानंतर राजस्थान रॉयल्सने पाच वेळा, कोलकाता नाईट रायडर्सने चार वेळा, मुंबई इंडियन्सने चार वेळा, सनरायझर्स हैदराबादने चार वेळा, आरसीबीने तीन वेळा आणि चेन्नई सुपर किंग्जने दोन वेळा २०० धावांचा टप्पा ओलांडला आहे.
आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक वेळा २००+ धावाआयपीएल २०२५- ४२*आयपीएल २०२४- ४१आयपीएल २०२३- ३७आयपीएल २०२२- १८आयपीएल २०१८- १५
गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांनी आधीच प्लेऑफचे तिकीट मिळवले आहे. येत्या २९ मे २०२४ पासून आयपीएल २०२५ मधील प्लेऑफचे सामने खेळले जाणार आहेत. तर, ३ जून २०२४ रोजी अंतिम सामना खेळला जाईल.