IPL 2025 RR vs CSK Riyan Parag Superb Catch : कार्यवाहू कर्णधार रियान पराग याच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सच्या संघानं दोन पराभवानंतर अखेर विजय मिळवला. गुवाहाटीच्या मैदानात राजस्थानच्या संघानं धावांच्या पाठलाग करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जला रोखून दाखवत पहिल्या विजयाची नोंद केली. राजस्थान संघाच्या विजयात नितीश राणाने केलेली ८१ धावांची दमदार खेळी, धावांचा बचाव करताना हसरंगाने घेतलेल्या ४ विकेट्स महत्त्वाच्या होत्याच. पण या सामन्यातील सर्वात मोठा टर्निंग पाइंट ठरला तो रियान पराग याने घेतलेला अप्रतिम कॅच. रियान परागनं शिवम दुबेचा कॅच घेतला अन् सामना राजस्थानच्या बाजूनं फिरला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
रियान परागनं घेतलेल्या अप्रतिम कॅचमुळे फिरली मॅच
चेन्नई सुपर किंग्जच्या संघाकडून इम्पॅक्ट प्लेयरच्या रुपात आलेल्या शिवम दुबेनं आपल्या भात्यातील तुफान फटकेबाजीसह प्रभाव टाकण्याचं काम सुरु केले होते. १ चौकार आणि २ षटकार मारत त्याने आपला आक्रमक अंदाज दाखवून दिला. तो थांबला तर सामना चेन्नई अगदी सहज जिंकणार याची झलकच त्याच्या फटकेबाजीत दिसून येत होती. राजस्थानच्या विजयातील तो मोठा अडथळा ठरू शकला असता. पण इथं कॅप्टन मदतीला धावला. रियान परागनं सर्वोत्तम झेल घेत शिवम दुबेला तंबूचा रस्ता दाखवला. हा झेल सामन्याला कलाटणी देणारा होता.
RR vs CSK : रियान परागनं धोनीसमोर 'हेलिकॉप्टर' उडवलं, मग CSK च्या 'मलिंगा'नं असा घेतला बदला
आक्रमक अंदाजात खेळत होता दुबे, पण राजस्थानच्या कॅप्टननं साधला साधला डाव
चेन्नई सुपर किंग्जच्या डावातील १० व्या षटकात वानिंदू हसरंगा गोलंदाजी करत होता. या षटकातील पहिल्या दोन चेंडूवर शिवम दुबेनं एक षटकार आणि एक चौकार मारला होता. चेन्नईच्या धाकड फलंदाजाने तिसऱ्या चेंडूवर ऑफच्या दिशनं जोरदार फटका मारला. या चेंडूवरही चार धावा लिहिल्यात असाच तो फटका होता. पण एक्स्ट्रा कव्हर फिल्ड पोझिशनवर उभा असलेल्या रियान परागने डाइव्ह मारत एक अप्रतिम कॅच टिपला. कॅच घेताना चेंडू जमिनीला स्पर्श झालेला नाही याची खात्री झाल्यावर थर्ड अपायरने शिवम दुबेला आउट दिले. हा कॅच झाला नसता तर मॅचचा रिझल्टही वेगळा असता. त्यामुळे रियान परागनं एका कॅचवर मॅच फिरवलीये, असे म्हणावे लागेल.
Web Title: IPL 2025 RR vs CSK Riyan Parag Superb Catch Of Dismiss Shivam Dube Watch Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.