Who Is Duplicate MS Dhoni At Arun Jaitley Stadium : राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील आयपीएल २०२५ स्पर्धेतील ६२ वा सामना दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवण्यात आला. CSK संघाचा स्पर्धेतील प्रवास जरी संपुष्टात आला असला तरी MS धोनीसाठी दिल्लीच्या मैदानातही चाहत्यांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. धोनीसाठी खास फलकबाजीशिवाय या सामना पाहण्यासाठी आलेल्या ड्युप्लिकेट धोनीनंही मैफिल लुटली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
एका बाजूला एमएस धोनी मैदानात बॅटिंग करत असताना दुसऱ्या बाजूला काही चाहते खऱ्या धोनीची बॅटिंग बघण्यापेक्षा हुबेहुब त्याच्यासारख्या दिसणाऱ्या स्टँडमधील व्यक्तीसोबत सेल्फी काढण्यात मग्न झाल्याचे पाहायला मिळाले. इथं जाणून घेऊयात ड्युप्लिकेट धोनीसंदर्भातील खास गोष्ट
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
कोण आहे MS Dhoni चा डयुप्लिकेट?
दिल्लीच्या स्टेडियमवर दिसलेल्या या व्यक्तीचे नाव रिषभ मालाकार असं आहे. त्याची चेहरापट्टी अगदी धोनीशी मिळती जुळती असल्यामुळे तो आता एक स्टार सोशल मीडिया इंफ्लूएंसरच्या रुपात ओळखला जातो. इन्स्टाग्रामवर त्याला ९० हजारहून अधिक फॉलोअर्स आहेत. रिषभ मालाकार याने आपल्या इन्स्टा स्टोरीच्या माध्यमातून दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवरील सामन्याला हजेरी लावणार असल्याची गोष्टही शेअर केली होती.
ड्युप्लिकेटमुळं काही मंडळींनी खऱ्याखुऱ्या धोनीची बॅटिंग केली मिस
अरुण जेटली स्टेडियम कॅमेरा त्याच्यावर फिरला अन् सोशल मीडियावर तो चर्चेत आला. स्टेडियमवर मॅचसाठी आलेल्या धोनीच्या अनेक चाहत्यांना त्याच्यासोबत सेल्फी घेण्याचा मोह देखील अनावर झाला. काही मंडळींनी तर त्याच्यासोबत सेल्फी घेण्याच्या नादात खऱ्या खुऱ्या धोनीची बॅटिंगही मिस केली.
राजस्थान विरुद्ध धोनीची धमक नाही दिसली
राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात महेंद्रसिंह धोनी नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. पण शेवटपर्यंत त्याला मैदानात तग धरता आला नाही. त्याने १७ चेंडूत एका षटकाराच्या मदतीने १६ धावांचे योगदान दिले. चेन्नई सुपर किंग्जने या सामन्यात राजस्थानसमोर १८८ धावांचे टार्गेट सेट केले होते. संजूच्या नेतृत्वाखालील संघाने हे आव्हान सहज परतवून लावले. धोनीच्या चेन्नईच्या खात्यात यंदाच्या हंगामात आणखी एका पराभवाची भर पडली.
Web Title: IPL 2025 RR vs CSK Match Who Is Duplicate MS Dhoni In Arun Jaitley Stadium Fans Ignoring Real Dhoni Batting For Selfie Watch Reactions
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.