Rishabh Pant Fined: IPL 2025च्या शेवटच्या लीग सामन्यात शतक केल्यानंतर लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंत खूप आनंदी दिसत होता. त्याचा उत्साहही शिगेला पोहोचला होता, पण या सामन्याचा निकाल त्याच्या बाजूने लागला नाही. इतकेच नव्हे तर सामन्यानंतर त्याला दंडदेखील भरावा लागला. मंगळवारी लखनौमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्धच्या सामन्यात संघाच्या स्लो ओव्हर रेटसाठी लखनौचा कर्णधार ऋषभ पंतला ३० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
पंतसह सर्व खेळाडूंनाही लाखोंचा दंड
LSG चा हा या हंगामातील तिसरा गुन्हा ठरला. ५ एप्रिल आणि २६ एप्रिल या दोन सामन्यांमध्येही पंतला षटकांची गती कमी राखल्याने दंड भरावा लागला होता. ओव्हर-रेट गुन्ह्यांशी संबंधित आयपीएलच्या आचारसंहितेनुसार, पंतला तिसऱ्या चुकीसाठी ३० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच, इम्पॅक्ट खेळाडूसह उर्वरित प्लेइंग इलेव्हन खेळाडूंना वैयक्तिकरित्या १२ लाख रुपये किंवा त्यांच्या मॅच फीच्या ५० टक्के (जे कमी असेल ते) दंड ठोठावण्यात आला आहे.
नव्या नियमामुळे पंतला दिलासा
ऋषभ पंतचा हा तिसरा गुन्हा होता. पण असे असूनही त्याला निलंबित केले जाणार नाही. IPL 2024 पर्यंत तिसऱ्या दंडानंतर एक सामन्याच्या बंदीचा नियम होता. IPL 2025 मध्ये नियमात सुधारणा करण्यात आली. पण गेल्या वर्षीच्या शेवटच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या याच्यावर बंदीची कारवाई झाली होती. त्यामुळे ती शिक्षा दिली गेली. त्यानंतर नियमातील बदल लागू केले गेले.
दरम्यान, सामन्यात पंतने ६१ चेंडूत नाबाद ११८ धावा केल्या, ज्यामुळे लखनौने ३ बाद २२७ धावा केल्या. परंतु विराट कोहलीच्या ५४ आणि जितेश शर्माच्या नाबाद ८५ धावांच्या जोरावर RCB ने सामना ६ विकेट्सने जिंकला.
Web Title: ipl 2025 rishabh pant fined 30 lakh third slow over rate offence bcci rcb vs lsg
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.