Rishabh Pant Century Celebration Anushka Sharma Stupid Word, IPL 2025 RCB vs LSG: संपूर्ण हंगामात दमदार कामगिरी करणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने आपल्या शेवटच्या साखळी सामन्यात लखनौ सुपर जायंट्स संघाला ६ गडी राखून पराभूत केले. कर्णधार ऋषभ पंतने नाबाद ११८ धावा करून लखनौच्या संघाला २२७ धावांची मजल गाठून दिली. पण जितेश शर्माची नाबाद ८५ धावांच्यी खेळी पंतच्या शतकावर भारी पडली. ऋषभ पंतला या हंगामासाठी ऐतिहासिक २७ कोटींच्या बोलीवर विकत घेतले होते. पण हंगामात तो पुरता फ्लॉप ठरला. फक्त मंगळवारी शेवटच्या सामन्यात त्याने दमदार शतक ठोकले. पण त्याच्या शतकानंतर घडलेला एक किस्सा आणि विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा यांच्याबद्दल सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
पंतच्या शतकानंतर काय घडले?
ऋषभ पंतने अवघ्या ५४ चेंडूत धडाकेबाज शतक ठोकले. आपल्या आयपीएल कारकिर्दीतील हे त्याचे दुसरे शतक होते. तसेच हंगामात त्याचे हे पहिलेच शतक ठरले. त्यामुळे त्याने या शतकाचा आनंद खास पद्धतीने साजरा केला. शतकानंतर त्याने ग्लोव्ह्ज काढले आणि कोलांटी उडी मारून शतकाचा आनंद व्यक्त केला. या सेलिब्रेशननंतरचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल झालाय. त्यात व्हिडीओमध्ये पंतच्या सेलिब्रेशननंतर अनुष्का शर्मासोबत बसलेल्या महिलेवर कॅमेरा जातो. नेमकी तेव्हाच ती महिला 'स्टुपिड' असा शब्द उच्चारते असा दावा केला जातोय.
पंतच्या सेलिब्रेशननंतर तिच्यावर कॅमेरा गेला तेव्हा सुरुवातील अनुष्का शर्मा तिला काहीतरी सांगताना दिसली. त्यानंतर ती महिला स्टुपिड असा शब्द म्हणाली. या मुद्द्यावर सोशल मीडियावर वाद रंगला आहे. काहींचे म्हणणे आहे की ती महिला पंतच्या सेलिब्रेशनबाबत तो शब्द म्हणाली. तर काहींचे म्हणणे आहे की ती कॅमेरामनला स्टुपिड म्हणाली.
इतकेच नव्हे, काहींनी तर थेट अनुष्का शर्माबाबतही भाष्य केले आहे. पंतचे शतक झालेले अनुष्काला आवडले नाही असा दावा काहींकडून करण्यात आला.
दरम्यान, अनुष्काने सामना संपल्यानंतर विराट कोहलीला फ्लाइंग किस देत आपले प्रेम व्यक्त केले. तसेच, तिने दिलेल्या पाठिंब्यासाठी विराट कोहलीनेही तिला फ्लाइंग किस दिला. त्यांचा व्हिडीओही सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला.
Web Title: IPL 2025 LSG vs RCB Rishabh Pant Century Somersault Celebration anushka unhappy lady said stupid video viral
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.